IND vs ENG: इंग्लंडच्या खेळाडूंकडून बॉलसोबत छेडछाड? सेहवागने विचारला प्रश्न

दरम्यान खेळाविषयी बोलायचं झाले तर दिवसाचे मुख्य आकर्षण चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यातील भागीदारी होते, तर कर्णधार कोहलीचा फ्लॉप शो सुरू होता.
IND vs ENG: इंग्लंडच्या खेळाडूंकडून बॉलसोबत  छेडछाड? सेहवागने विचारला प्रश्न
IND vs ENG: इंग्लंडच्या खेळाडूंकडून बॉलसोबत छेडछाड? सेहवागने विचारला प्रश्नTwiitter/@virendersehwag
Published On

लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स (Lords Cricket Ground) मैदानावर भारत आणि यजमान इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा खेळापेक्षा इतर गोष्टींवर अधिक चर्चा झाली. भारतीय सलामीवीर केएल राहुलला (KL Rahul) शनिवारी इंग्लिश प्रेक्षकांनी बिअरच्या बाटल्यांचे कॉर्क (झाकण) फेकल्याची घटना थंडावली नाही तर दुसऱ्या दिवशीही इतर घटनांनी क्रिकेट खेळाला लाजवेल अशा गोष्टी घडल्या.

या सामन्यातील भारताच्या दुसऱ्या डावादरम्यान, इंग्लंडचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (james Anderson) खेळपट्टीवर धावताना दिसला होता, ज्यामुळे त्याचा भारतीय कर्णधार विराट कोहलीशी (Virat Kohli) वाद झाला होता. तर माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) एक फोटो व्हायरल केला आहे. त्यात त्याने बॅाल टँपरींगवरती प्रश्न उपस्थित केला आहे. या फोटोमध्ये इंग्लंडचा एक खेळाडू आपल्या बूटाने चेंडू दाबताना दिसत आहे.

दरम्यान खेळाविषयी बोलायचं झाले तर दिवसाचे मुख्य आकर्षण चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यातील भागीदारी होते, तर कर्णधार कोहलीचा फ्लॉप शो सुरू होता. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 6 बाद 181 वर 154 धावांची आघाडी घेतली होती. अजिंक्य रहाणे 61 धावा करून बाद झाला.

रविवारी भारताचा दुसरा डाव सुरू झाला तेव्हा मार्क वुडने दोन्ही सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांना 27 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. भारत अजूनही इंग्लंडच्या चार धावांनी मागे होता. चेतेश्वर पुजारा आणि कोहली क्रिजवर होते. यानंतर, 17 व्या षटकात एक घटना घडली ज्यावर कोहली अँडरसन यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

IND vs ENG: इंग्लंडच्या खेळाडूंकडून बॉलसोबत  छेडछाड? सेहवागने विचारला प्रश्न
अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी देश का सोडला? फेसबुक पोस्ट लिहित दिले उत्तर

१७ व्या षटकात चौथा चेंडू टाकल्यानंतर अँडरसन खेळपट्टीच्या मध्यभागी धावला, त्यानंतर स्ट्राइकनर नसलेल्या कोहलीने अँडरसनला अडवले आणि म्हणाला की ही खेळपट्टी आहे. तुमच्या घराच्या मागचं अंगण नाही मध्यभागी चालत आहेत. या दोघांमधील भांडणाचा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल झाला. खराब फॉर्मशी झुंज देणारा कोहली या घटनेनंतर फार काळ विकेटवर टिकू शकला नाही आणि 24 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सॅम करनने त्याला बाद केले.

दरम्यान, सेहवागने इंग्लंडच्या खेळाडूचा एक फोटो ट्विट केला आहे. ज्यात एक खेळाडू बूटाने बॉल दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सेहवागने ट्विटमध्ये लिहिले, "काय होत आहे. इंग्लंडचे खेळाडू बॅल टँपरींग करत आहेत की कोविडला रोखण्यासाठी हा काही उपाय आहेत". आकाश चोप्रा यानीही यावर ट्विट केले, पण कोणताही फोटो पोस्ट केला नाही. टीव्हीवर त्याने पाहिलेली एकमेव गोष्ट म्हणजे खेळाडू त्याच्या स्पाइक्सने बॉल मारत होता. त्याने याबाबत ट्विट केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com