andrew russell twitter
क्रीडा

WI vs ENG,T20 Series: कहरच! २ वर्षांनंतर कमबॅक करणाऱ्या रसेलने पहिल्याच सामन्यात घातला धुमाकूळ

Andrew Russell News: आंद्रे रसेलला दोन वर्षांनंतर वेस्टइंडिज संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. या संधीचं सोनं करत त्याने पहिल्याच सामन्यात गोलंदाजीत आणि फलंदाजीत दमदार खेळ केला आहे

Ankush Dhavre

West Indies vs England, Andrew Russell:

वेस्टइंडिजचा आक्रमक खेळाडू आंद्रे रसेलला दोन वर्षांनंतर वेस्टइंडिज संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. या संधीचं सोनं करत त्याने पहिल्याच सामन्यात गोलंदाजीत आणि फलंदाजीत दमदार खेळ केला आहे. या सामन्यात त्याने आधी भेदक गोलंदाजी केली. त्यानंतर फलंदाजीत इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दमदार अष्टपैलू कामगिरीसह त्याने आपल्या संघाला जोरदार विजय मिळवून दिला आहे.

रसेलची अष्टपैलू कामगिरी..

वेस्टइंडिज आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे.मालिकेतील पहिल्याच सामन्यात रसेलने गोलंदाजी करताना १९ धावा खर्च करत ३ फलंदाजांना बाद केलं.

त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने १४ चेंडूंचा सामना करत २९ धावा केल्या. रसेलसाठी हा सामना अतिशय महत्वाचा होता. कारण गेले काही महिने संघाबाहेर राहिल्यानंतर त्याला राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली होती.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर या सामन्यात इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने १९.३ षटकात १७१ धावा केल्या. इंग्लंडकडून सलामीला आलेल्या सॉल्टने ४० धावा केल्या. तर कर्णधार जोस बटलरने ३९ धावांची खेळी केली. लियाम लिव्हिंगस्टनने २७, विल जॅकने १७ आणि बेन डकेटने १४ धावांचे योगदान दिले. इंग्लंडला या डावात १७१ धावा करता आल्या. (Latest sports updates)

वेस्टइंडिजला हा सामना जिंकण्यासाठी १७२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करत असताना वेस्टइंडिजच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली. मात्र अवघ्या ३२ धावांवर त्यांना पहिला धक्का बसला.

काईल मेयर्स आणि शाई होप यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. या सामन्यातील १४.४ षटकअखेर वेस्टइंडिजने १२३ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या. इथुन वेस्टइंडिजचा विजय कठीण दिसून येत होता. मात्र त्यानंतर रसेल शो पाहायला मिळाला. रसेलने २९ धावांची आक्रमक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT