jos buttler twitter
Sports

Jos Buttler Six: एकच नंबर... जोस बटलरने खेचला 115 मीटर लांब षटकार! VIDEO एकदा पाहाच

Jos Buttler Six Video: जोस बटलरने वेस्टइंडीजविरुद्ध झालेल्या सामन्यात ११५ मीटर लांब षटकार खेचला आहे.

Ankush Dhavre

WI vs ENG, Jos Buttler Six: इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर मैदानात परतला आहे. गेली काही महिने तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. आता वेस्टइंडिजविरुद्धच्या टी -२० मालिकेतून त्याने कमबॅक केलं आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात गुडाकेशने पकडलेल्या शानदार कॅचमुळे तो गोल्डन डकवर बाद झाला होता.

मात्र मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने सुरुवातीपासूनच खिंड लढवली आणि संघाला विजय मिळवून दिला. यादरम्यान त्याने गगनचुंबी षटकार खेचला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो.

जोस बटलरने खेचला ११५ मीटर लांब षटकार

वेस्टइंडीजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात जोस बटलरने ११५ मीटर लांब षटकार खेचला. हा षटकार टी-२० क्रिकेटमधील सर्वात लांब षटकारांपैकी एक आहे. तर झाले असे की, इंग्लंडची फलंदाजी सुरु असताना गुडाकेश मोती ९ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. या षटकातील तिसऱ्याच चेंडूवर बटलरने स्टेपआऊट होऊन, स्टेडियमच्या छतावर षटकार मारला.

जोस बटलरने या सामन्यात इंग्लंडला विजय मिळवून देण्यासाठी पूर्ण जोर लावला. त्याने ४५ चेंडूंचा सामना करत ८३ धावांची तुफानी खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान त्याने ८ चौकार आणि ६ गगनचुंबी षटकार खेचले. धावांचा पाठलाग करताना त्याने विल जॅक्ससोबत मिळून दुसऱ्या विकेटसाठी ७२ चेंडूत १२९ धावांची भागीदारी केली. जॅक्सने या डावात फलंदाजी करताना २९ चेंडूत ३८ धावांची खेळी केली.

या शानदार विजयासह वेस्टइंडीजने या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर वेस्टइंडीजने प्रथम फलंदाजी करताना ८ गडी बाद १५८ धावा केल्या होत्या. वेस्टइंडीजकडून फलंदाजी करताना रोमेन पॉवेलने ४१ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी १५९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने ३१ चेंडू शिल्लक ठेवून हा सामना आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

SCROLL FOR NEXT