WI vs AUS: सलग तिसऱ्या सामन्यातही ऑस्टेलियाचा दारुण पराभव Twitter/ @ICC
Sports

WI vs AUS: सलग तिसऱ्या सामन्यातही ऑस्टेलियाचा दारुण पराभव

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया (Wi vs AUS) यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरु आहे.

वृत्तसंस्था

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया (Wi vs AUS) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या (T-20 Series) तिसर्‍या सामन्यात विंडीज संघाने ऑस्ट्रेलियाला 6 विकेटने पराभूत करून तिसरा सामना जिंकला आहे. यासह वेस्ट इंडीजने या मालिकेत 3-0 अशी अतुलनीय आघाडी घेतली आहे. पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाला 18 धावांनी पराभूत केले, दुसर्‍या सामन्यात 56 धावांनी आणि तिसर्‍या सामन्यात 6 विकेट्सने पराभूत केले.

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 141 धावा केल्या. दुसरीकडे वेस्ट इंडिजकडून ख्रिस गेलच्या तुफानी खेळीमुळे हे लक्ष्य अवघ्या 14.5 षटकांत 4 गडी गमावून गाठले गेले.

ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्कले आपल्या पहिल्याच शटकात आंद्रे प्लेचरला बाद केले. गेल या सामन्यात आपला सांभाव्य खेळ खेळताना दिसला तर सिमंस 15 धावा करुण बाद झाला. मिचेल स्टार्कने आपल्या अखेरच्या शटकतात 8 धावा दिल्या. त्याने आपल्या संपुर्ण स्पेलमध्ये 4 षटकात 1 बळी घेत 15 धावा दिल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये ख्रिस गेलला जास्त काही करामत दाखवता आली नाही. परंतु तिसर्‍या सामन्यात तो पुन्हा एकदा आपल्या जुन्या शैलीत दिसला. त्याने 38 चेंडूत 67 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान त्याने 7 षटकार आणि 4 चौकार लगावले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नवरात्र उत्सवाला एकनाथ शिंदे भेट देणार

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

SCROLL FOR NEXT