Ind W vs Eng W: विजयानंतरही टीम इंडियाला दंड, हरमनप्रीतने केली चूक कबूल

तीन सामन्यांच्या टी-20 (Ind W vs Eng W) मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने नेत्रदीपक पुनरागमन केले आणि दुसरा सामना जिंकला.
Ind W vs Eng W Series
Ind W vs Eng W SeriesTwitter/ @ICC
Published On

भारतीय महिला क्रिकेट (Indian Women's Team) संघाने डू आणि डायच्या दुसर्‍या टी-20 (IND W vs ENG W Second T-20) सामन्यात इंग्लंडविरुद्ध शानदार विजय नोंदविला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 4 गडी गमावून 148 धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमानांनी 8 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 140 धावा करू शकला. भारताने हा सामना 8 धावांनी जिंकून तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली आहे. या सामन्यादरम्यान संथ गोलंदाजी केल्याबद्दल भारतीय संघाला दंड ठोठावण्यात आला आहे.

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने नेत्रदीपक पुनरागमन केले आणि दुसरा सामना जिंकला. आता तिसरा सामना मालिकेचा विजेता ठरवेल. या सामन्यादरम्यान भारतीय संघाने आयसीसीने टी -20 सामन्यांसाठी दिलेल्या वेळेपेक्षा संथ गोलंदाजी केली. नियमानुसार एका षटकासाठी संपुर्ण संघाची 20 टक्के रक्कम कापली जाते.

Ind W vs Eng W Series
Tokyo Olympics: वयाच्या 40 व्या वर्षी तेजस्विनी खेळणार ऑलिम्पिक

आयसीसीच्या प्रसिद्धीनुसार मॅच रेफरी फिल विट्ट्केस यांनी हा दंड ठोठावला आहे. भारतीय महिला संघ निर्धारित वेळेत २० षटकांचा कोटा पूर्ण करू शकला नाही त्यांनी एक षटकाचा विलंब केला होता. आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयसीसी प्लेअर आणि सपोर्ट स्टाफच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार खेळाडूंना प्रत्येक षटकासाठी २० टक्के दंड ठोठावण्यात येतो.

टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने मॅच रेफरींनी ठोठावलेला दंड आणि संथ गोलंदाजी केल्याचा आरोप स्वीकारला आहे. त्यानंतर आयसीसीने ठरविल्यानुसार 20 टक्के दंड ठोठावला गेला आणि औपचारिक सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही. दोन्ही देशांमधील मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना 14 जुलै रोजी चेल्म्सफोर्ड येथे खेळला जाईल.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com