Hardik Pandya Statement saam tv
Sports

Hardik Pandya: तिलक वर्माला मैदानातून माघारी का पाठवलं? हार्दिक म्हणाला त्याला ते जमत नव्हतं...

Hardik Pandya Statement: मुंबई इंडियन्सने आपला चौथा सामना लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध खेळला, ज्यामध्ये शेवटच्या षटकात १२ धावांनी त्यांना पराभव स्विकारावा लागला. या पराभवाचं श्रेय मोठ्या प्रमाणात कर्णधार हार्दिक पांड्याच्या निर्णयांवर जात असल्याची चर्चा रंगत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एकाना स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरं जावं लागलं. टीमने या सिझनमध्ये एकूण चार सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांना तीन पराभव पत्करावाला लागलं आहे. मुंबईचा चौथा सामना लखनऊ सुपर जायंट्ससोबत होता. या सामन्यात मुंबईने शेवटच्या ओव्हरमध्ये १२ रन्सची पराभव स्वीकारला. टीमच्या पराभवासाठी कर्णधार हार्दिक पांड्याला मोठ्या प्रमाणात जबाबदार मानले जात आहे.

दरम्यान लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध मिळालेल्या पराभवानंतर हार्दिक पंड्यापण निराश दिसला. सामन्यानंतर हार्दिक म्हणाला की, "त्याच्या टीमने गोलंदाजी करताना १०-१२ अतिरिक्त रन्स दिले आणि तेच आम्हाला महागात पडलं." लखनऊविरुद्धच्या या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने निर्धारित २० ओव्हरमध्ये २०३ रन्स केले. ज्याच्या प्रत्युत्तरात मुंबईला फक्त १९१ रन्स करता आले.

गोलंदाजांवर फोडलं खापर

हार्दिकने पुढे सांगितलं की, पराभव हा नेहमी निराशाजनक असतो. खरं सांगायचं तर आही १०-१२ रन्स आम्ही जास्त दिले. आणि तुम्ही पाहिलंत तर त्याच फरकाने आम्ही हरलो. मी नेहमीच माझ्या गोलंदाजीचा आनंद घेतला आहे. माझ्याकडे जास्त पर्याय नाहीत पण मी विकेटचं मूल्यांकन केल्यानंतर माझे पर्याय हुशारीने निवडतो.

तिलक वर्मावर काय म्हणाला हार्दिक?

मुंबई टीमला विजयासाठी सात बॉल्समध्ये २४ रन्सची आवश्यकता होती. त्यावेळी तिलक वर्माला रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय घेतला. तिलक मोठे फटके खेळण्यासाठी संघर्ष करत होता. त्याने २३ चेंडूत २५ रन्स केले होते. याबद्दल विचारले असता हार्दिक म्हणाला, 'आम्हाला काही मोठे फटके मारण्याची गरज होती, पण तिलकला ते जमत नव्हतं. क्रिकेटमध्ये असे काही दिवस येतात जेव्हा तुम्ही प्रयत्न करता पण ते यशस्वी होत नाही. फक्त चांगलं क्रिकेट खेळा, मला सामन्यातील गोष्टी सहज ठेवायला आवडतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची हत्या

Fact Check: बाजारात ५५० रूपयांचं कॉईन? १०० आणि ७५ रुपयांचंही कॉईन येणार?

Accident: मुंबईत अपघाताचा थरार! हायवेवर रेस लावणं पडलं महागात, महागड्या पोर्शे कारचा चुराडा; पाहा VIDEO

Besan Ladoo Recipe : ना कडक ना जास्त चिकट; 'असे' बनवा परफेक्ट खमंग बेसनाचे लाडू

Arbaaz Khan Daughter Name : खान कुटुंबात आली प्रिंसेस, अरबाज-शूराने ठेवलं लेकीचं खास नाव

SCROLL FOR NEXT