शनिवारी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने आगामी टी-२० वर्ल्डकप २०२६ साठी टीम इंडियाची घोषणा केली. यावेळी टीमचा स्क्वॉड पाहून प्रत्येकजण चकित झाला. याचा कारण होतं ते म्हणजे शुभमन गिलला वगळण्याचं. आगामी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ साठी वनडे आणि टेस्ट टीमचा कर्णधार शुभमन गिलला बाहेर केलंय.
शुभमन टी-२० फॉर्मेचा उपकर्धणार असून त्याला या मोठ्या स्पर्धेतून वगळण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून मॅनेजमेंटचा त्याच्यावर असलेला विश्वास पाहता त्याला वर्ल्डकपच्या टीममध्ये जागा मिळेल हे सर्वांनी जणू निश्चित समजलं होतं. मात्र शनिवारी स्क्वॉडची घोषणा झाल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला.
टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली असून गिलला टीममध्ये का सिलेक्ट केलं नाही असा प्रश्न आता सोशल मीडियावरून विचारण्यात येतोय. यामागे अनेक तर्कही लावण्यात येतायत. मात्र इंडियन एक्सप्रेसनच्या एका रिपोर्टमध्ये गिलला बाहेर केल्याचं ठोस कारण सांगण्यात आलं आहे.
या रिपोर्टनुसार, गिलला शनिवारी टीमची घोषणा होईपर्यंत त्याला वगळण्यात आल्याची कल्पना दिली नव्हती. तर दुसरीकडे निवड समितीकडून त्याला वर्ल्डकपमधून बाहेर काढण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेण्यात आला होता.
रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलंय की, टी20 वर्ल्ड कप 2026 साठी तयार करण्यात आलेल्यी पीचमुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. टीम इंडियाचे वर्ल्डकपचे सर्व सामने विविध मैदानावर खेळवण्यात येणार आहेत. जशी स्पर्धा पुढे जाईल तशी खेळपट्टी स्लो होण्याची शक्यता असते. याच कारणामुळे सिलेक्टर्सने गिलच्या ऐवजी संजू सॅमसन, अभिषेक आणि इशान किशन यांच्या फलंदाजीवर अधिक विश्वास ठेवलाय.
गिलला बाहेरचा रस्ता दाखवल्यावर सिलेक्टर्सने प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये म्हटलंय की, सध्या तरी आम्ही कॉम्बिनेशनवर विचार करतोय. जेव्हा तुम्ही १५ खेळाडूंना सिलेक्ट करता तेव्हा कोणाला ना कोणाला बाहेर पडावच लागतं. दुर्देवाने तो गिल आहे. याचा अर्थ असा नाही की तो चांगला खेळाडू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.