shubman gill twitter
क्रीडा

Shubman Gill: शुभमन गिलला आपल्या जर्सीचा नंबर का लपवावा लागला? समोर आलं मोठं कारण

Shubman Gill Jersey Number, Duleep Trophy: भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिलला दुलीप ट्रॉफीत आपला जर्सी नंबर लपवावा लागला आहे.

Ankush Dhavre

भारतात डॉमेस्टीक सिझनला सुरुवात झाली आहे. या सिझनची सुरुवात दुलीप ट्रॉफी स्पर्धेने झाली आहे. ५ सप्टेंबरपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. एका ट्रॉफीसाठी ४ संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे.

स्पर्धेतील पहिल्या दिवशी चारही संघ मैदानात खेळण्यासाठी उतरले आहेत. दरम्यान इंडिया ए विरुद्ध इंडिया बी आणि इंडिया सी विरु्द्ध इंडिया डी या चारही संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे.

या सामन्यात तुम्ही एक गोष्ट नक्कीच नोटीस केली असेल, की शुभमन गिल आपल्या जर्सीचा नंबर लपवण्यासाठी टेप लावून उतरला आहे. दरम्यान काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

भारताचा युवा स्टार खेळाडू शुभमन गिल (Shubman gill) या स्पर्धेत भारतीय अ संघाचं नेतृत्व करतोय. दरम्यान शुभमन गिलला आपला जर्सी नंबर लपवावा लागला आहे. तो जर्सीला टेप लावून का उतरला,यामागचं कारण आता समोर आलं आहे.

काय आहे कारण?

शुभमन गिल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७७ क्रमांकाची जर्सी परिधान करतो. मात्र त्याच्याकडे ७७ क्रमांकाची जर्सी परिधान करण्याची अनुमती नसल्याने त्याला आपल्या जर्सीला टेप लावून मैदानात उतरावं लागलं. त्यामुळेच त्याला आपल्या जर्सीचा नंबर लपवावा लागला आहे.

गिलने घेतला शानदार कॅच

या सामन्यातील पहिल्याच दिवशी शुभमन गिलने शानदार कॅच घेतला आहे. तर झाले असे की, रिषभ पंत फलंदाजीला आला असताना आवेश खान गोलंदाजी करत होता. त्यावेळी रिषभ पंतने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.

मात्र चेंडू फार दुर गेला नाही. उंच हवेत गेलेला चेंडूचा अचूक अंदाज घेत गिलने मागच्या दिशेने धावत शानदार कॅच घेतला. या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. स्पर्धेतील पहिल्याच दिवशी इंडिया बी संघाने २०० धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान मुशीर खान शतकी खेळी करत नाबाद परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tongue colour Health: जिभेचा बदललेला रंग देतात 'या' गंभीर आजारांचे संकेत, तुमच्या जिभेचा रंग कोणता?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की भाजप, शिराळा विधानसभेत कोणाचं पारडं जड? पाहा एक्झिट पोल

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT