Sachin Tendulkar and Arjun Tendulkar  Saam Tv
Sports

Sachin Tendulkar: अर्जुनचा पहिला सामना सचिनने ड्रेसिंग रूममधून का पाहिला? सचिनने सांगितलेलं कारण ऐकून अभिमान वाटेल

Sachin Tendulkar on Arjun's Debut: सचिन तेंडुलकरने डग आउटमधून नव्हे तर ड्रेसिंग रूममधून का पहिला?

Ankush Dhavre

MI VS KKR IPL 2023: आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने अर्जुन तेंडुलकरवर २० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. त्यानंतर २ वर्षे तो बेंचवर बसून राहिला आणि संधीची वाट पाहिली.

अखेर २०२३ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्व झालेल्या सामन्यात त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. वानखेडेच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात वडील सचिन तेंडुलकर आणि बहीण सारा तेंडुलकर देखील या क्षणाचे साक्षीदार झाले.

मात्र अर्जुनचा पहिला सामना सचिन तेंडुलकरने डग आउटमधून नव्हे तर ड्रेसिंग रूममधून का पहिला? याचा खुलासा स्वतः सचिन तेंडुलकरने केला आहे.

आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात सचिन तेंडुलकर आपल्या भावना व्यक्त करताना दिसून येत आहे. त्याने या व्हिडिओमध्ये म्हटले की, 'माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव होता. कारण आजपर्यंत मी आजपर्यंत मी त्याला प्रत्यक्ष जाऊन खेळताना पाहिलं नव्हतं. त्याला जे काही करायचे आहे ते बाहेर जाऊन व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य त्याला हवे होते.'

तसेच Sachin Tendulkar ने पुढे म्हटले की,'मी ड्रेसिंग रुममध्ये बसलो होतो. कारण मला त्याला त्याच्या योजनांपासून दूर जाऊ द्यायचे नव्हते. मी मोठया स्क्रीनकडे पाहिलं त्यावेळी मी दिसत होतो, मी लगेच आत आलो.' हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

तसेच या सामान्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथमी फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून वेंकटेश अय्यरने सर्वाधिक १०४ धावांची खेळी केली.

तर आंद्रे रसलने २१ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटक अखेर ६ गडी बाद १८५ धावा केल्या होत्या.

तर या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून ईशान किशनने ५८ आणि सूर्यकुमार यादवने ४३ धावांची खेळी करत मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT