सध्या भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये २ सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जातेय. या सिरीजमधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. तर दुसरा सामना कानपूरमध्ये उद्यापासून म्हणजेच शुक्रवारपासून खेळवला जाणार आहे. दरम्यान सिरीजमधील पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर देखील बीसीसीआय आणि रो-को ( रोहित शर्मा-विराट कोहली ) यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.
टीम इंडियाने माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यावेळी संजय मांजरेकरांनी विराट आणि रोहित यांना स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप केला आहे.
चेपॉकच्या टेस्टनंतर संजय मांजरेकर यांनी हे विधान केलं आहे. या सामन्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना साजेसा खेळ करता आला नाही. या सामन्यामध्ये दोन्ही खेळाडू फलंदाजमध्ये फेल ठरल्याचं दिसून आलं. पहिल्या टेस्टमध्ये रोहितला एकूण ११ तर विराट कोहलीला २१ रन्स करता आले.
विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन्ही खेळाडू दुलिप ट्रॉफीमध्ये खेळले नव्हते. या दोघांनाही दुलिप ट्रॉफीमधून खेळण्यासाठी सूट दिली होती. दरम्यान यावेळी बीसीसीआयच्या या निर्णयावर संजय मांजरेकर यांनी नाराजी व्यक्त केलीये. त्यांच्या म्हणण्यानुसार, या स्पर्धेत न खेळल्याने भारतीय क्रिकेटचं नुकसान झालं आहे.
इएसपीएल क्रिकइन्फोशी बोलताना मांजरेकर म्हणाले, मला काळजी करत नाहीये. पण मला खात्री आहे की, जर ते रेड बॉल क्रिकेट खेळले असता तर त्यांची कामगिरी आणखी चांगली होऊ शकली असती. त्यांच्याकडे दुलीप ट्रॉफी निवडण्याचा पर्याय होता. त्यामुळे आपल्याला काही खेळाडूंना स्पेशल ट्रिटमेंट देणं टाळलं पाहिजे.
यावेळी भारतीय क्रिकेट आणि खेळाडूसाठी सर्वोत्तम पर्याय पाहावा. विराट आणि रोहित यांनी दुलीप ट्रॉफी न खेळणं हे भारतीय क्रिकेटसाठी योग्य नव्हतं. जर त्यांनी दुलिप ट्रॉफी खेळली असती तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असती.
रोहित आणि विराट हे दोघंही टीम इंडियाचे मोठे खेळाडू आहेत, यामध्ये दुमत नाही. फॉर्म मिळवणं हे त्याच्यासाठी मोठं आव्हान नाही. मात्र रेड बॉल क्रिकेट मर्यादित झालं असून त्यांनी या फॉर्मेटमध्ये थोडा वेळ घालवला असता तर त्याचे परिणाम अधिक चांगले झाले असते, असंही मांजरेकर म्हणाले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.