Latest Cricket Updates in Marathi: भारतात देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांना सुरुवात झाली आहे. आगामी रणजी ट्रॉफी २०२४-२५ हंगामासाठी दिल्लीने आपला संभावित खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. या खेळाडूंमध्ये विराट कोहलीचा देखील समावेश आहे. २०१८ नंतर पहिल्यांदाच विराटचा रणजी संघात समावेश करण्यात आला आहे.
विराट २०१२-१३ हंगामानंतर रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरलेला नाही. त्याचा दिल्लीच्या संभावित संघात समावेश करण्यात आला असला तरीदेखील तो ही स्पर्धा खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण यावेळी भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त असेल.
भारतीय संघ सध्या बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघाला बॉर्डर- गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला जावं लागणार आहे. दिल्लीच्या संभावित संघात विराटसह, रिषभ पंतचा दिल्ली संघात समावेश करण्यात आला आहे. हे दोघेही भारतीय कसोटी संघातील प्रमुख खेळाडू आहेत. असं असतानाही या खेळाडूंचा दिल्लीच्या संभावित संघात समावेश कसा? असा प्रश्न क्रिकेट फॅन्स विचारु लागले आहेत.
आगामी रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेला येत्या ११ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेतील फायनलचा सामना २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यादरम्यान भारतीय संघ न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हात करताना दिसणार आहे.
विराट कोहली, रिषभ पंत, हिम्मत सिंग, प्रांशु विजयन, अनिरुद्ध चौधरी, क्षितिज शर्मा, वैभव कांडपाल, सिद्धांत बंसल, समर्थ सेठ, जोंटी सिद्धू, सिद्धांत शर्मा, तिशांत डाबला, नवदीप सैनी, हर्ष त्यागी, लक्ष्य थरेजा (यष्टीरक्षक), सुमित माथुर, शिवांक वशिष्ठ, सलिल मल्होत्रा, आयुष बडोनी, गगन वत्स, राहुल एस डागर, रितिक शौकीन, मयंक रावत, अनुज रावत (यष्टीरक्षक),रौनक वाघेला, मनप्रीत सिंग, राहुल गहलोत, आर्यन सहरावत, शिवम शर्मा, सिद्धार्थ शर्मा, पर्व सिंगला, योगेश सिंग, दीपेश बालियान, सागर तंवर, रिषभ राणा, अखिल चौधरी, दिग्वेश राठी, सार्थक रंजन, अजय गुलिया, सिमरजीत सिंग, शिवम कुमार त्रिपाठी, कुलदीप यादव, ललित यादव, प्रिंस चौधरी, शिवम किशोर कुमार, शिवम गुप्ता (यष्टीरक्षक), वैभव शर्मा, जितेश सिंग, रोहित यादव, सुमित कुमार, अनमोल शर्मा, केशव डाबा, सनत सांगवान, शुभम शर्मा (यष्टीरक्षक), आर्यन चौधरी, आर्यन राणा , भगवान सिंग, प्रणव राजवंशी (यष्टीरक्षक), सौरव डागर, मनी ग्रेवाल, कुँवर बिधूड़ी, निखिल सांगवान, पुनीत चहल, प्रियांश आर्य, यश धुल, प्रिंस यादव, हर्षित राणा, मयंक यादव, सुयश शर्मा, अर्पित राणा, दिविज मेहरा, सुजल सिंग, हार्दिक शर्मा, हिमांशु चौहान, आयुष डोसेजा , अंकित राजेश कुमार, ध्रुव कौशिक, अंकुर कौशिक, कृष यादव, वंश बेदी, यश सहरावत, विकास सोलंकी, राजेश शर्मा, तेजस्वी दहिया (यष्टीरक्षक)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.