why rohit sharma given chance to devdutt padikkal in india vs england 5th test know the reason  twitter
Sports

Devdutt Padikkal Debut: तर या कारणामुळे पडीक्कलला पदार्पणाची संधी मिळाली! रोहितने सांगितलं कारण

India vs England 5th Test: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या शेवटच्या कसोटीत देवदत्त पडीक्कलला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे

Ankush Dhavre

Devdutt Padikkal Debut News In Marathi:

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या शेवटच्या कसोटीत देवदत्त पडीक्कलला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. आपला १०० वा कसोटी सामना खेळत असलेल्या आर अश्विनने त्याला पदार्पणाची कॅप दिली. या मालिकेत सरफराज खान, रजत पाटीदार, ध्रुव जुरेलनंतर आता देवदत्त पडीक्कलची लॉटरी लागली आहे. यापूर्वी त्याने भारताच्या टी -२० संघातूनही खेळण्याची संधी मिळाली आहे. (Devdutt Padikkal Debut)

५ खेळाडूंनी केलं पदार्पण..

विराट कोहली आणि केएल राहुसारख्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी दिली गेली. विशाखापट्टनमच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रजत पाटीदारला पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. तर तिसऱ्या कसोटीत ध्रुव जुरेल आणि सरफराज खानला पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. त्यानंतर रांचीमध्ये झालेल्या चौथ्या कसोटीत वेगवान गोलंदाज आकाशदीपला पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. (Cricket news in marathi)

रजत पाटीदार दुखापतग्रस्त..

गेल्या ३ सामन्यात संधी मिळालेला रजत पाटीदार हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही. दरम्यान अंतिम कसोटी सामन्यासाठी प्लेइंग ११ ची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी रोहितने रजत पाटीदार का बाहेर आहे, यामागचं कारण सांगितलं. रजत डाव्या घोट्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. असं रोहितने सांगितलं.

अशी राहिलीये कारकिर्द...

देवदत्त पडिक्कलच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ५८ सामन्यांमध्ये ४३.६८ च्या सरासरीने ४०६३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १२ शतकं आणि २२ अर्धशतकं देखील झळकावली आहेत. तसेच १९६ धावा ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे.

भारतीय संघ आघाडीवर..

तसेच या मालिकेबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाला मालिकेतील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पुढील ३ सामन्यांमध्ये भारतीय संघाने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघ कसोटी मालिकेत ३-१ ने आघाडीवर आहे.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

भाारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, सर्फराज खान, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin : धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचाऱ्यांनीही घेतले लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये!

Maharashtra Rain Live News : जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

आई होण्याचं योग्य वय कोणतं मानलं जातं?

Visapur Fort History: महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांपैकी विसापूर किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

Kalyan Rain : उल्हास नदीला पूर; पुलावरून पाणी वाहत असल्याने महामार्ग वाहतुकीस बंद

SCROLL FOR NEXT