rajasthan royals twitter
Sports

IPL 2025: संजूच्या जागी रियानला कर्णधार का बनवलं? ही आहेत ३ प्रमुख कारणं

Why Riyan Parag Named Captain: संजू सॅमसनच्या जागी रियान परागला कर्णधार बनवण्याचं नेमकं कारण काय? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेचा थरार २२ मार्चपासून रंगणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी कसून सरावाला देखील सुरुवात केली आहे. राजस्थान रॉयल्सने देखील आपल्या सरावाला सुरुवात केली आहे. या स्पर्धेपूर्वी राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे.

संजू सॅमसन सुरुवातीचे ३ सामने कर्णधार म्हणून खेळताना दिसून येणार नाहीये. तो सुरुवातीचे ३ सामने केवळ फलंदाज म्हणून खेळताना दिसेल. तर संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रियान परागकडे सोपवली गेली आहे.

संजू सॅमसनच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो यष्टीरक्षण करताना दिसून येणार नाही. तो यष्टीरक्षणाऐवजी क्षेत्ररक्षण करताना दिसेल. तर युवा खेळाडू रियान परागच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली आहे. दरम्यान रियान परागला कर्णधार बनवण्याची नेमकी कारणं काय? जाणून घ्या.

संजूला दुखापतीपासून दूर ठेवण्यासाठी

संजू सॅमसनच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो पूर्णवेळ क्षेत्ररक्षण करताना दिसून येणार नाही. तो केवळ फलंदाजी करतान दिसेल. सुरुवातीच्या ३ सामन्यात संजू सॅमसन संघाचं नेतृत्व करताना दिसून येईल. यावरुन हे स्पष्ट आहे की, संजू सॅमसनला दुखापतीपासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्याचा अनुभव

रियान परागला गेल्या वर्षी भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो आसामकडून खेळतो. त्याने या संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यामुळे त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

युवा आणि संघातील अनुभवी खेळाडू

रियान पराग युवा खेळाडू आहे. मात्र त्याला या संघाकडून खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. त्याला २०१९ मध्ये या संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या संघात संजू सॅमसननंतर रियान पराग हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT