jasprit bumrah yandex
क्रीडा

Jasprit Bumrah ला उप-कर्णधार पदावरुन का काढलं? समोर आलं मोठं कारण

Jasprit Bumrah Vice Captaincy: जसप्रीत बुमराहला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान तर देण्यात आलंय मात्र त्याला उप कर्णधारपद देण्यात आलेलं नाही.

Ankush Dhavre

Why Jasprit Bumrah Removed From Vice Captaincy: जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. त्याचा अनुभव पाहता, त्याच्याकडे भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत तो उप कर्णधाराची भुमिका बजावताना दिसून आला होता. मात्र बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत त्याला उपकर्णधार बनवण्यात आलेलं नाही.

बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघ आपल्या मजबूत प्लेइंग ११ सह मैदानात उतरणार आहे. या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात विराट कोहली, रिषभ पंत, केएल राहुल यांना स्थान देण्यात आलं आहे. मात्र उप कर्णधार म्हणून कोणालाही उप कर्णधारपद देण्यात आलेलं नाही.

काय आहे कारण?

काही दिवसांपूर्वी गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे. गंभीर आल्यापासून कर्णधार आणि उप कर्णधारपदाची व्याख्या बदलली आहे. रोहित शर्माने आयसीसी टी -२० वर्ल्डकप झाल्यानंतर टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टी -२० कर्णधारपदाची जागा रिकामी झाली.

ही जागा भरून काढण्यासाठी हार्दिक पंड्याला प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे न देता सूर्यकुमार यादवची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्यावेळी हार्दिकच्या फिटनेसचं कारण देण्यात आलं होतं. हार्दिक पंड्या फिटनेसच्या समस्येमुळे अनेकदा संघाबाहेर असतो. त्यामुळे त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती.

जसप्रीत बुमराहच्या बाबतीतही काही वेगळं घडलेलं नाही. जसप्रीत बुमराह सुद्धा अनेकदा दुखापतीमुळे संघाबाहेर राहिला आहे. यासह वर्कलोड मॅनेज करण्यासाठी त्याला अनेकदा विश्रांती देण्यात आली आहे.

बुमराहला नेतृ्त्व करण्याचा अनुभव नाही, अशातला काही भाग नाही. यापूर्वीही त्याला इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. मात्र बीसीसीआय त्याच्यावर असलेला वर्कलोड कमी करण्यासाठी त्याला विश्रांती देत आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला येत्या १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. हा सामना चेन्नईत रंगणार आहे. तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानावर रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Metro Job: दिल्ली मेट्रोत मॅनेजर होण्याची संधी; महिना ८७००० रुपये पगार, पात्रता काय? जाणून घ्या

Ice cream ला संस्कृतमध्ये काय म्हणतात? तुम्हाला माहितेय का?

Viral Video: हे प्रभु ! एक्सीलेटरवरुन येण्याची नवीन पद्दत, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

Viral Video: नातवासाठी काहीपण! चिमुकल्याला हसवण्यासाठी आजोबांचा डान्स; पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: बुलडाण्यात पोलिस व्हॅन आणि पिकअपची समोरासमोर धडक, २ पोलिसांसह तिघे गंभीर

SCROLL FOR NEXT