india vs china saam tv news
क्रीडा

Explainer: लोकसंख्येत जगात पहिल्या स्थानावर, तरीही ऑलिम्पिक मेडल्समध्ये भारत चीनपेक्षा मागे का?

Why Do Indians Get so Few Medals in the Olympics Compared to China: भारत आणि चीन हे लोकसंख्येच्या बाबतीत मागे पुढेच आहेत. मात्र पदकांच्या बाबतीत भारत हा चीनच्या आसपासही नाही.

Ankush Dhavre

India In International Sport Events: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा समारोप झाला आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी अपेक्षाभंग केल्याचे पाहायला मिळाले आहे. यंदा पदकांची संख्या वाढणार असं म्हटलं जात होतं. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ७ पदकांची कमाई केली होती.

ही संख्या खालावली असून, भारतीय खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ६ पदकांची कमाई केली आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनलाही मागे सोडलं आहे. मात्र ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांच्या बाबतीत आपण त्यांना मागे सोडणं तर दुर, आपण त्यांच्या आसपासही नाही.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेबद्दलच बोलायचं झालं, तर चीनने या स्पर्धेत एकूण ९१ पदकं पटकावली. ज्यात ४० सुवर्ण, २७ रौप्य आणि २४ कांस्य पदकांचा समावेश आहे. तर भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत ६ पदकांची कमाई केली. ज्यात १ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे.

ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी कोट्यवधी फॅन्स खेळाडूंकडून आस लावून ठेवतात की, यावेळी भारताची संख्या वाढणार. मात्र ऑलिम्पिक स्पर्धा झाल्यानंतर एकच चर्चा रंगते, ती म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीत मागे असलेला चीन भारतापेक्षा पुढे कसा? काय आहेत यामागची कारणं? जाणून घ्या.

भारताला ऑलिम्पिकमध्ये जास्त पदके का मिळत नाहीत?

खेळ विकासावर अधिक भर

चीनने १९३२ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत पदार्पण केलं. १९८० नंतर चीनने खेळांमध्ये मोठी गुंतवणूक करायला सुरुवात केली. तर भारताने खेळसंरचना विकसित करण्यात खूप उशीर केला. ही खेळसरंचना अजूनही पूर्णपणे विकसित झालेली नाही. भारतातील ग्रामीण भागात भरपूर टॅलेंटेड खेळाडू आहेत. मात्र अजूनही त्यांना हव्या त्या सुविधा मिळालेल्या नाहीत.

सरकारकडून खेळांमध्ये गुंतवणूक

चीन सरकारकडून क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले जाते. देशाचा आर्थिक बजेट केला जातो, त्यावेळी चीनचा खेळांसाठीचा बजेट हा १० अब्ज डॉलर्स इतका असतो. याउलट भारताचा २०२३-२४ साठीचा बजेट हा ३६६ दशलक्ष (३,३९७ कोटी) डॉलर इतका होता. हे चीनच्या तुलनेत खूपच कमी आहे.

खेळाडूंचा शोध

चीनमध्ये सुमारे ३ हजारांहून अधिक शाळा आहेत. या शाळांमध्ये लहानपणापासूनच खेळाडूंचा शोध घेतला जातो आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरासाठी घडवलं जातं. त्यामुळेच चीनमध्ये टॅलेंटेड खेळाडूंची संख्या अधिक आहे. याऊलट भारतातील खेळसरंचना तितकी प्रगतशील झालेली नाही. देशात प्रशिक्षित केंद्रांची संख्या खूप कमी आहे. ज्या खेळांडूना खरंच खेळांची आवड आहे. त्या खेळाडूंना पैशाअभावी पुढे जाता येत नाही.

विशिष्ट खेळांवर लक्ष केंद्रित करणे

चीनने जिम्नॅस्टिक्स, डायव्हिंग, वेटलिफ्टिंग आणि टेबल टेनिस यांसारख्या खेळांवर अधिक भर दिला आहे. चीनमधील मुलं शाळेत असतानाच त्यांना या खेळांची ट्रेनिंग दिली जाते. तर भारतात कुस्ती, बॉक्सिंग, आणि शूटिंगसारख्या खेळांमध्ये अनियमित यश मिळवले आहे.मात्र हव्या तितके खेळाडू वर येऊ शकत नाहीत.

क्रिकेटवर अधिक लक्ष

भारतात क्रिकेटची लोकप्रियता अधिक आहे. भारतात क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. मात्र अनेक अशा शाळा आहेत, जिथे हा खेळ खेळला जात नाही. मात्र क्रिकेट महागडा खेळ असूनही खेळला जातो. हेच कारण आहे की, खेळाडू ऑलिम्पिकमध्ये असलेल्या खेळांकडे वळत नाहीत.

गेल्या ३ ऑलिम्पिक स्पर्धेतील रेकॉर्ड

२०२४ पॅरिस ऑलिम्पिक

भारत: ६ पदकं (० सुवर्ण, १ रौप्य, ५ कांस्य)

चीन: ९१ पदकं (४० सवर्ण, २७ रौप्य, २४ कांस्य)

. २०२० टोकियो ऑलिंपिक

  • भारत: ७ पदके (१ सुवर्ण, २ रौप्य, ४ कांस्य)

  • चीन: ८८ पदके (३८ सुवर्ण, ३२ रौप्य, १८ कांस्य)

. २०१६ रिओ ऑलिंपिक

  • भारत: २ पदके (० सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य)

  • चीन: ७० पदके (२६ सुवर्ण, १८ रौप्य, २६ कांस्य)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT