australia cricket team twitter
Sports

IND vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलियन खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून का उतरले मैदानात? वाचा कारण

Australia Cricket Team: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत.

Ankush Dhavre

Australian Cricket Team Black Armband: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना अॅडलेडच्या मैदानावर सुरु आहे. हा डे- नाईट कसोटी सामना असणार आहे. गेल्या सामन्यातून बाहेर राहिलेला कर्णधार रोहित शर्माने या सामन्यातून कमबॅक केलं आहे.

या सामन्यात भारतीय संघाने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान खेळाडू जेव्हा राष्ट्रगीतासाठी मैदानात आले, त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या हातावर काळी पट्टी असल्याचं दिसून आलं. मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी हातावर काळी पट्टी का बांधली? जाणून घ्या कारण.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी हाताला काळी पट्टी का बांधली, यामागचं कारण समोर आलं आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू फिलिप ह्यूजचा मृत्यू होऊ १० वर्ष पूर्ण झाली आहेत. देशांतर्गत क्रिकेट सामना खेळत असताना, चेंडू लागून फिल ह्यूजचा मृत्यू झाला होता.

त्यावेळी सीन अबॉटने टाकलेला चेंडू फिल ह्यूजच्या मानेला जाऊन लागला होता. या बाऊन्सर चेंडूने फिल ह्यूजचा जीव घेतला होता. त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत.

यासह ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान रेडपाथ यांचा याच महिन्यात मृत्यू झाला. त्यांनी वयाच्या ८३ वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना देखील श्रद्धांजली वाहण्यासाठी हाताला काळी पट्टी बांधली आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

पैट कमिंस (कप्तान), उस्मान ख्वाजा, नाथन मैकस्वीनी, मार्नस लैबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, स्कॉट बोलँड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT