IND vs ENG Lord's Test saam tv
Sports

IND vs ENG Lord's Test: कोण जिंकणार तिसरी टेस्ट? लॉर्ड्सवर कोणाचं पारडं जड? पाहा आकडे काय सांगतात!

Ind vs Eng Lord's Test Stats: लॉर्ड्स मैदानावर आज तिसरा सामना खेळवला जाणार आहे. सध्या भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील सिरीज १-१ अशी बरोबरीत आहे. मात्र लॉर्ड्सवर कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टेस्ट सिरीज सध्या खेळवण्यात येतेय. यामध्ये तिसरा सामना आज लॉर्ड्सच्या मैदानावर रंगणार आहे. दोन सामन्यांनंतर सिरीज 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यावर सर्वांची नजर असणार आहे. मात्र एक मोठी गोष्ट म्हणजे या ऐतिहासिक मैदानावर भारताचा रेकॉर्ड विशेष चांगला नाही.

चार वर्षांपूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला विजय मिळाला होता. या मिळालेल्या विजयाने एक खास इतिहास रचला होता. आता शुभमन गिल त्या इतिहासाची पुनरावृत्ती करू शकतो का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

लॉर्ड्स मैदानावर भारताचा परफॉर्मन्स

भारत आणि इंग्लंडमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर आतापर्यंत एकूण 19 टेस्ट सामने खेळले गेले आहेत. मात्र आपण जर आकडे पाहिले तर त्यापैकी फक्त 3 वेळा भारताने विजय मिळवला आहे. इंग्लंडने याच मैदानावर 12 सामने जिंकले आहेत तर उर्वरित 4 सामने अनिर्णीत राहिले आहेत.

भारतातर्फे लॉर्ड्सवरील पहिला विजय 1986 मध्ये नोंदवण्यात आला होता. त्यानंतर 2014 मध्ये दुसऱ्यांदा आणि 2021 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा लॉर्ड्सवर विजय मिळवण्यात आला. आता जर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारत विजय मिळवला तर हा लॉर्ड्सवरील चौथा ऐतिहासिक विजय ठरणार आहे.

दुसऱ्या सामन्यात भारताचा विजय

सिरीजमधील दुसरा सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर झाला होता. इंग्लंडने या मैदानावर सातपैकी सहा सामने जिंकले होते, एक सामना ड्रॉ राहिला होता. शुभमन गिलच्या नेतृत्वातील टीम इंडियाने 336 रन्सने एक मोठा विजय मिळवून इतिहास घडवला होता. यानंतर आता टीम इंडिया आता लॉर्ड्सवर विजय मिळवण्याच्या तयारीत आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

यशस्वी जयसवाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर / नीतीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप

इंग्लंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime News : दारू देण्यास नकार, तरुणांची सटकली; हॉटेल मालकावर अंदाधुंद गोळीबार, जळगावमध्ये खळबळ

Maharashtra Live News Update : सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी विधान परिषदेमध्ये चर्चा

Pune News: गणेशोत्सवाआधी पुण्यातील ढोल-ताशा पथकांना आनंदाची बातमी, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

GK: सूर्योदय-सूर्यास्त वेळी सूर्य लाल का असतो? यामागे लपलंय रहस्य

Kapil Sharma : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातील रेस्टॉरंटवर गोळीबार | VIDEO

SCROLL FOR NEXT