MI vs RCB Match Live Saam Tv News
Sports

MI vs RCB : इकडे आड तिकडे विहीर! रोहित आणि बुमराहने हार्दिक पंड्याची डोकेदुखी वाढवली, कारण काय?

MI vs RCB Match Live : रोहित शर्माही गेल्या सामन्यात खेळला नाही. जर रोहित तंदुरुस्त झाला आणि बुमराह परतला तर मुंबई संघात दोन बदल दिसून येतील. त्यापूर्वी कर्णधार हार्दिक पंड्याची डोकेदुखी वाढली आहे.

Prashant Patil

मुंबई : आज आयपीएल २०२५ चा मोठा सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या हंगामात एमआयची कामगिरी काही खास राहिलेली नाही. त्यांनी पहिल्या चारपैकी तीन सामने गमावले आहेत. दुसरीकडे, आरसीबीने हंगामाची सुरुवात चांगली केली होती, परंतु गुजरात टायटन्सविरुद्धच्या पराभवामुळे त्यांची लय थोडी बिघडली आहे. या सामन्यात एमआय संघाविरुद्ध आरसीबी विजयी मार्गावर परतू शकेल का, याकडे सर्वांचं लक्ष असेल.

जसप्रीत बुमराह संघात सामील, रोहित शर्माच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह

भारतीय संघाचा डॅशिंग यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह संघात सामील झाला आहे. एमआयचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळेल की नाही हे पाहणे बाकी आहे. बुमराह लवकरच परतण्याची अपेक्षा आहे, परंतु आरसीबी विरुद्धचा हा सामना त्याच्यासाठी थोडा लवकर असू शकतो. रोहित शर्माही गेल्या सामन्यात खेळला नाही. जर रोहित तंदुरुस्त झाला आणि बुमराह परतला तर मुंबई संघात दोन बदल दिसून येतील. त्यापूर्वी कर्णधार हार्दिक पंड्याची डोकेदुखी वाढली आहे. या दोघांना जर संघात घेतलं तर पंड्या कोणत्या खेळाडूला खाली बसवणार आहे, हे बघणंही महत्त्वाचं असणार आहे.

गेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध मुंबई इंडियन्सचा पराभव ज्या पद्धतीने झाला तो धक्कादायक होता. तिलक वर्माला चालू सामन्यात खाली बसवल्यानंतर बराच गोंधळ सुरू असताना हार्दिक पंड्या मैदानावर होता. हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले. सूर्यकुमार यादवलाही काहीच समजलं नाही. म्हणूनच मुंबई इंडियन्सना असं वाटतं की जर रोहित आणि बुमराह मॅच फिट असतील तर दोघांनीही मैदानात उतरावं आणि संघाला पुन्हा विजयी मार्गावर आणावं. मुंबईच्या संघासाठी एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे, मुंबईचा घरच्या मैदानावर चांगला रेकॉर्ड आहे.

रोहित शर्मा लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळला नाही. हार्दिक पांड्याने सांगितलं होतं की, सरावादरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. रोहित शर्माची अलिकडची कामगिरी चांगली राहिलेली नाही. आशा आहे की, एकदा त्याला थोडी विश्रांती मिळाली की तो पुन्हा त्याच्या लयमध्ये येईल. या मोठ्या सामन्यात तो नक्कीच खेळेल अशी अपेक्षा आहे. असं मानले जातं की राज बावा माजी कर्णधारासाठी जागा सोडू शकतो, तर पदार्पणाच्या सामन्यात कहर करणाऱ्या अश्विनी कुमारची जागा बुमराह घेऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes: डायबिटीज कंट्रोल होत नाहीये? या गोष्टीची कमी वाढवू शकतं टेन्शन

सरकारकडून लाडक्या बहिणींना दसरा-दिवाळीचं मोठं गिफ्ट; बँक खात्यात पाठवले 10 हजार रुपये|VIDEO

Friday Tips: शुक्रवारी हे पदार्थ खाण टाळा, अन्यथा...

Dhule Police : धुळ्यात एमडी ड्रग्सचा साठा हस्तगत; धुळे पोलिसांकडून कारवाई, दोघे ताब्यात

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

SCROLL FOR NEXT