दक्षिण आफ्रिकेचा दौरा झाल्यानंतर टीम इंडिया घरच्या मैदानात अफगाणिस्तानशी भिडणार आहे. टीम इंडियाची अफगाणिस्तानच्या विरोधात तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. अफगाणिस्तानविरुद्ध ११ जानेवारीपासून मालिका सुरु आहे. या दौऱ्यात हार्दिक, सूर्या अनफिट झाले तर अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यांसाठी कोण संघाचं नेतृत्व करणार,यावरून क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू आहे. (Latest Marathi News)
अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिका टीम इंडियाचं नेतृत्व कोण करणार, हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांमध्ये उपस्थित झाला आहे. सध्या हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव हे दुखापतग्रस्त आहेत. दोन्ही खेळाडू या मालिकेच्या बाहेर राहणार असण्याची शक्यता आहे. यामुळे कर्णधारपद कोणाकडे द्यायचं, हा प्रश्न निवडकर्त्यांना पडला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
क्रिकबजच्या माहितीनुसार, अफगाणिस्तान दौऱ्यासाठी कर्णधार कोणाला नेमायचं, हा मोठा प्रश्न निवडकर्त्यांसमोर असणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत.
रोहित आणि विराटने २०२२च्या विश्वचषकानंतर एकही टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. रोहितने संघात पुनरागमन केल्यास तो अफगाणिस्तानविरोधात टी-२० मालिकेत संघाचं नेतृत्व करु शकतो.
रोहित शर्माने गेल्या विश्वचषक स्पर्धेत १२५.९४ च्या स्ट्राईक रेटने ५९७ धावा केल्या. त्यामुळे रोहित शर्मा हा अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेत संघाचं नेतृत्व करण्यास सक्षम असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे त्याला नजरेआड करणं सोपे नाही. टी-२० मालिकेत रोहितकडे संघाचं नेतृत्व दिलं नाही तर शुभमन गिल,रवींद्र जडेजा आणि श्रेयस अय्यरच्या नावाचा विचार असू शकतो.
गेल्या टी२० विश्वचषकातीत बहुतांश सामन्यात हार्दिक पंड्याने संघाचं नेतृत्व केलं आहे. २०२२ च्या टी-२० विश्वचषकानंतर टीम इंडियाने एकूण २६ सामने खेळले आहेत. टी-२० विश्वचषकानंतर हार्दिक पंड्याकडे संघाचं नेतृत्व सोपविण्यात आलं होतं.
आयर्लंडविरुद्ध जसप्रीत बुमराहने संघाचं नेतृत्व केलं. तर आशियाई स्पर्धेत ऋतुराज गायकवाडने संघाचं नेतृत्व केलं होतं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सूर्यकुमार यादवने संघाचं नेतृत्व केलं होतं.
पहिला टी-२० सामना : ११ जानेवारी, मोहाली
दुसरा टी-२० सामना: १४ जानेवारी, इंदूर
तिसरा टी-२० सामना : १७ जानेवारी, बेंगळुरू
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.