David Warner: कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरचा मोठा कारनामा! मोडून काढला लक्ष्मण अन् डिव्हिलीयर्सचा रेकॉर्ड

David Warner Record News: वॉर्नरने आपल्या शेवटच्या सामन्यात दिग्गज भारतीय खेळाडू वीवीएस लक्ष्मण आणि दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू एबी डिव्हिलीयर्सचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
ind vs pak
ind vs pakgoogle
Published On

David Warner Record News:

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नरने अखेर कसोटी क्रिकेटला रामराम केला आहे. दरम्यान त्याने आपल्या शेवटच्या सामन्यात दिग्गज भारतीय खेळाडू वीवीएस लक्ष्मण आणि दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू एबी डिव्हिलीयर्सचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. हा रेकॉर्ड आहे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा.

नुकताच ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली.या मालिकेतील शेवटच्या सामन्यातील दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नरने ५७ धावांची खेळी केली. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये८७८६ धावा करत आपल्या कसोटी कारकिर्दीचा शेवट केला. (David Warner Record)

तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत २२ व्या स्थानी पोहोचला आहे. वॉर्नरने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ११२ कसोटी सामन्यांमध्ये ४४.५९ च्या सरासरीने ८७८६ धावा केल्या. यादरम्यान त्याने २६ शतकं आणि ३७ अर्धशतकं झळकावली आहेत. (Latest sports updates)

तसेच ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत डेव्हिड वॉर्नर पाचव्या स्थानी पोहोचला आहे.यापूर्वी रिकी पाँटींगने सर्वाधिक १३३८७ धावा केल्या. तर स्टीव वॉ ने १०९२७, स्टिव्ह स्थिथने ९५१४ धावा केल्या. त्याने ८६४३ धावा करणाऱ्या मायकल क्लार्कला मागे सोडलं आहे.

शेवटच्या सामन्यात केली अर्धशतकी खेळी..

पाकिस्तानविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळत असलेल्या डेव्हिड वॉर्नरने ५७ धावांची खेळी केली. यादरम्यान तो LBW बाद होऊन माघारी परतला आहे. त्याने या खेळीदरम्यान ७ चौकार मारले.

डेव्हिड वॉर्नर बाद झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी देखील स्पोर्ट्समन स्पिरीट दाखवत त्याचं अभिनंदन केलं. तर सामना पाहण्यासाठी आलेल्या हजारो प्रेक्षकांनी उभं राहुन त्याला निरोप दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com