AUS vs PAK Test Series: ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानला धोबीपछाड! कसोटी मालिका ३-० ने जिंकली

Australia vs Pakistan Test Series: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा डंका पाहायला मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाने सिडनीचं मैदान मारत पाकिस्तानवर जोरदार विजय मिळवला आहे.
aus vs pak
aus vs pakgoogle
Published On

Australia vs Pakistan Test Series:

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा डंका पाहायला मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाने सिडनीचं मैदान मारत पाकिस्तानवर जोरदार विजय मिळवला आहे. आधी पर्थ, मेलबर्न आणि आता सिडनीच्या मैदानावर पाकिस्तानला धूळ चारत ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-० ने आपल्या नावावर केली आहे. ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटीत पाकिस्तानवर ३६० धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर मेलबर्न कसोटीत ६९ धावांनी आता सिडनी कसोटीत ८ गडी राखून विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियाकडून धावांचा यशस्वी पाठलाग..

ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानने अवघ्या १३० धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी ८ गडी शिल्लक ठेऊन पूर्ण केलं. या विजयासह वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा सुपडा साफ केला आहे.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ३१३ धावा केल्या. पाकिस्तानकडून फलंदाजी करताना मोहम्मद रिजवानने सर्वाधिक ८८ धावांची खेळी केली. तर आमेर जमालने ८२ आणि आगा सलमानने ५३ धावा चोपल्या. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना पॅट कमिन्सने सर्वाधिक ५ गडी बाद केले. (Latest sports updates)

aus vs pak
IND vs SA 2nd Test: केपटाऊनमध्ये इतिहास घडला! दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत टीम इंडियाची मालिकेत १-१ ची बरोबरी

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव..

पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने २९९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना मार्नस लाबुशेन आणि मिचेल मार्श सुपरहिट ठरले. लाबुशेनने ६० तर मार्शने सर्वाधिक ५४ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना मीर आमेर जमालने सर्वाधिक ६ गडी बाद केले.

aus vs pak
PKL Season 10: पटनाचा डिफेन्स गडबडला,दिल्लीचे रेडर्स चमकले! अटीतटीच्या लढतीत दबंग दिल्लीचा पटना पायरेटसवर संघर्षपूर्ण विजय

या सामन्यातील दुसऱ्या डावात पाकिस्तानला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानचा संघ अवघ्या ११५ धावांवर आटोपला. पाकिस्तानचा डाव स्वस्तात आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ १३० धावांची गरज होती. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने सहज पूर्ण करत पाकिस्तानला धूळ चारली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com