मंगळवारी अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या पहिल्या टेस्ट सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडने भारताचा पराभव केला. लीड्समध्ये ३७१ रन्सचं लक्ष्य देऊनही टीम इंडिया पराभूत झाल्याने चाहते मात्र आश्चर्यचकित झाले. या टेस्ट सामन्यात भारताकडून ५ शतकं झळकावली. मुळात ही पहिलीच वेळ आहे. तरीही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली हा पहिलाच सामना होता.
दरम्यान या फलंदाजांची कामगिरी चांगली असताना टीम इंडिया कशी काय हरली हा प्रश्न चाहत्यांसमोर आहे. या पराभवामागती काय ५ कारणं आहे ते आपण जाणून घेऊया. टीम इंडिया नेमकी कुठे कमी पडली हे पाहूयात.
भारतीय टीमची खालच्या फळीची फलंदाजी ही चिंतेची बाब ठरताना दिसतेय. दोन्ही डावांत ती कोसळली. पहिल्या डावात शेवटच्या ७ विकेट्स ४१ रन्समध्ये पडले. त्यानंतर दुसऱ्या डावात ३१ रन्समध्ये ६ विकेट्स गेले. यावेळी पाचव्या दिवशी फलंदाजीसाठी उत्कृष्ट असलेल्या खेळपट्टीवर ७२ रन्समध्ये १३ विकेट्स गमावणं हे पराभवाचे एक प्रमुख कारण आहे.
या सामन्यात टीम इंडियाची फिल्डींग फारच खराब होती. यामध्ये खासकरून यशस्वी जयस्वालने खराब फिल्डींग केल्याचं पाहायला मिळालं. पहिल्या डावात भारताने ५ विकेट्स गमावल्या. दुसऱ्या डावात २ कॅच सोडले. यावेळी दुसऱ्या डावात जॅक क्रॉलीचा कॅच सोपा नव्हता. जसप्रीत बुमराहने फॉलोथ्रूमध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आलं नाही.
जसप्रीत बुमराह वगळता भारताची गोलंदाजी काही फारशी चांगली झाली नाही. बुमराहलाही खास स्पेल टाकता येत नव्हते. मोहम्मद सिराजने दुसऱ्या डावात चांगली गोलंदाजी केली. पण त्याला विकेट घेता आल्या नाहीत. त्याने पहिल्या डावात अगदी सामान्य गोलंदाजी केली. प्रसिद्ध कृष्णाची गोलंदाजीही खूप महागडी ठरली. दोन्ही डावात त्याने ६ पेक्षा जास्त इकॉनॉमीने रन्स दिले. तर शार्दूल ठाकुरलाही फारशी चांगली गोलंदाजी करता आली नाही.
जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात हॅरी ब्रूकला शून्यावर बाद केलं. मात्र हा बॉल नो बॉल होता. यावेळी हॅरी ब्रूकने ९९ रन्सची खेळी केली. या ९९ रन्सच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने ४६५ रन्सचा टप्पा गाठला.
लीड्समध्ये भारताच्या पराभवाचं एक कारण म्हणजे टॉस. २०१७ नंतर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमने लीड्समध्ये विजय मिळवण्याची ही ७ वी वेळ आहे. २५० पेक्षा जास्त रन्सचं लक्ष्य ५ वेळा पूर्ण करण्यात आलं. ३२० पेक्षा जास्त रन्सचं लक्ष्य गाठण्याची ही तिसरी वेळ आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.