sachin dhas  twitter
Sports

Sachin Dhas: जन्माआधीच ठरलेलं सचिन क्रिकेटर होणार! वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारा सचिन धस आहे तरी कोण?

Who Is Sachin Dhas: बीडच्या मातीतला मराठमोळा खेळाडू सचिन धस हा भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला आहे. सचिन धस नेमका आहे तरी कोण? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Who Is Sachin Dhas:

बीडच्या मातीतला मराठमोळा खेळाडू सचिन धस हा भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला आहे. आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी २४५ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने २ गडी राखून विजय मिळवला.या विजयात सचिनने सर्वाधिक ९६ धावांची खेळी केली. तर उदय सहारनने ८१ धावा जोडल्या. दोघांनी मिळून १७१ धावा जोडत संघाला फायनलचं तिकीट मिळवून दिला.

हा सामना सुरुवातीलाच भारतीय संघाच्या हातून निसटला होता. कारण २४५ धावांचा पाठलाग करत असताना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अवघ्या ३२ धावांवर भारताच्या ४ फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर सचिनने मोर्चा सांभाळत ११ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ९६ धावांची तुफानी खेळी केली. त्याला या स्पर्धेतील सलग दुसरं शतक झळकावण्याची संधी होती. मात्र त्याचं हे शतक केवळ ४ धावांनी हुकलं आहे.

कोण आहे सचिन धस?

सचिन धस हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात राहतो. सचिनच्या जन्मापूर्वीच त्याच्या वडिलांनी स्वप्न पाहिलं होतं की, माझा मुलगा मोठा क्रिकेटपटू होणार. सचिनचे वडील सचिन तेंडुकरचे मोठे फॅन आहेत. (Cricket news in marathi)

त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सचिनने वयाच्या चौथ्या वर्षीच बॅट पकडली आणि महाराष्ट्राने भारताला दुसरा सचिन दिला. त्याचं नाव हे सचिन तेंडुलकरच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. त्याने नेपाळविरुद्ध झालेल्या सामन्यात आपल्या वडिलांच्या वाढदिवशीच शतक झळकावलं होतं.

सचिनची आई सुरेखा धस या महाराष्ट्र पोलिसमध्ये सहायक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर त्या माजी कबड्डीपटू देखील आहेत. तर सचिनची बहीण पुण्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करतेय. आपला मुलगा आपलं स्वप्न पूर्ण करणार या आशेनेच त्याच्या वडिलांनी त्याच्या हातात बॅट दिली. सचिननेही वडिलांचं स्वप्न पू्र्ण करुन दाखवलं.

आयुष्याचं शिखर गाठल्यासारखं वाटेल..

सचिनच्या वडिलांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की,'माझी इतकीच अपेक्षा आहे की, त्याने हा आशिया कप, अंडर १९ वर्ल्डकप आणि लवकरच भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करावं हीच माझी इच्छा आहे. असं झाल्यास मला आयुष्याचं सर्वात मोठं शिखर गाठल्यासारखं वाटेल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farhan Akhtar: फरहान अख्तरने खरेदी केली मर्सिडीज कार; किंमत वाचून नेटकरी थक्क

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना तब्येतीची काळजी घ्यावी लागणार, वाचा राशीभविष्य

Mumbai-Pune Express Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे होणार १० पदरी, प्रवास होईल आणखी सुसाट; काय आहे मेगाप्लान?

Dev Diwali 2025 date: कधी आहे देव दिवाळी? पृथ्वीवर येऊन देवता साजरी करणार दिवाळी, वाचा कथा

Maharashtra Live News Update: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही पोलिसांचे निलंबन करा- देवेंद्र फडणवीसांचे आदेश

SCROLL FOR NEXT