Beed Crickter Sachin Dhas Profile Saamtv
क्रीडा

Who Is Sachin Dhas: मराठवाड्याचा सुपुत्र भारतीय संघात; बीडचा 'सचिन' गाजवणार क्रिकेटचं मैदान!

Beed Crickter Sachin Dhas Profile: मराठवाड्याचा उदयोन्मुख प्रतिभावान क्रिकेटपटू म्हणून सचिन धसकडे (Sachin Dhas) पाहिले जाते. टीम इंडियाच्या १९ वर्षाखालील संघात एन्ट्री मारुन बीडचा हा पठ्ठ्या क्रिकेटच मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.

Gangappa Pujari

Who Is Sachin Dhas:

दुबई येथे होणाऱ्या युवा आशिया चषकासाठी भारतीय संघात निवड झाल्याचे बीसीसीआयनेने नुकतेच त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे. या स्पर्धेसाठी मराठवाड्याचा सुपुत्र सचिन धसची भारतीय संघात निवड करण्यात आली. सचिन हा धडाकेबाज फलंदाज असून याआधी त्याने कुचबिहारी करंडक स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व केले आहे.

कोण आहे सचिन धस?

मराठवाड्याचा उदयोन्मुख प्रतिभावान क्रिकेटपटू म्हणून सचिन धसकडे (Sachin Dhas) पाहिले जाते. सचिन धस हा मुळचा बीडचा. सचिनला लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड. त्याचे वडील संजय धस हे बीडमधील (Beed) आरोग्य विभागात कामाला आहेत. तर आई सुरेखा धस पोलीस अधिकारी आहे. सचिनची क्रिकेटप्रेती असलेली आवड ओळखून त्याला आई वडिलांनी शहरातीलच एका क्रिकेट क्लबमध्ये त्याला प्रवेश घेऊन दिला.

सर्वप्रथम सचिन धस हा चौदा वर्षांखालील राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत खेळला. त्यानंतर त्याच्या फलंदाजीची धार दिवसेंदिवस वाढत गेली. त्याची चौदा वर्षाखालील महाराष्ट्र संघातही निवड झाली होती. आता थेट टीम इंडियाच्या १९ वर्षाखालील संघात एन्ट्री मारुन बीडचा हा पठ्ठ्या क्रिकेटच मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धनंजय मुंडेंनीही केले कौतुक..

टीम इंडियात (Team India) निवड झाल्यानंतर सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बीडचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही सचिनचे अभिनंदन केले आहे. भारतीय अंडर -19 क्रिकेट संघात आगामी एशिया कपसाठी बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र, तडफदार फलंदाज सचिन धस याची निवड झाली असुन, हा जिल्ह्यावसीयांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हणले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

Government Job: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT