Who is ashutosh sharma the hero of punjab kings victory against gujarat titans amd2000 twitter
Sports

Ashutosh Singh: युवराजचा रेकॉर्ड मोडला, आता गुजरातच्या गोलंदाजांचा घाम काढणारा आशुतोष आहे तरी कोण?

Who Is Ashutosh Sharma: पंजाबला विजय मिळवून देणाऱ्या या खेळाडूने युवराज सिंगचा देखील रेकॉर्ड मोडून काढला आहे. कोण आहे आशुतोष शर्मा? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Who Is Ashutosh Sharma News In Marathi:

गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात पंजाबने शानदार विजय मिळवला. या विजयात पंजाबचा विस्फोटक फलंदाज आशुतोष शर्माने मोलाचं योगदान दिलं. त्याने १७ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३१ धावांची विस्फोटक खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. मुख्य बाब म्हणजे त्याने ही खेळी तेव्हा केलों, जेव्हा संघाला खूप गरज होती. पंजाबला विजय मिळवून देणाऱ्या या खेळाडूने युवराज सिंगचा देखील रेकॉर्ड मोडून काढला आहे. कोण आहे आशुतोष शर्मा? जाणून घ्या.

आपल्या आक्रमक खेळीने लक्ष वेधून घेणाऱ्या आशुतोषचा जन्म १५ सप्टेंबर १९९८ रोजी मध्यप्रदेशच्या रतलाममध्ये झाला. सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो रेल्वे संघाचं प्रतिनिधित्व करतो. यापूर्वी तो मध्यप्रदेश संघासाठी खेळायचा. माध्यमातील वृत्तानुसार, २०२० मध्ये जेव्हा चंद्रकांत पंडित यांची मध्यप्रदेश संघाच्या मुख्यप्रशिक्षकपदी वर्णी लागल्यानंतर त्याला बाहेर केलं गेलं होतं. त्यानंतर तो रेल्वे संघाकडून खेळू लागला. असं म्हटलं जातं की, भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू नमन ओझाने त्याला इथपर्यंत पोहचवण्यात मदत केली. (Cricket news in marathi)

युवराजचा रेकॉर्ड मोडला...

आशुतोष शर्मा हा गतवर्षी झालेल्या सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेत तुफान चर्चेत आला होता. या स्पर्धेत गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत त्याने ११ चेंडूत वादळी अर्धशतक झळकावलं होतं. या वादळी खेळीसह त्याने युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडून काढला होता. हा कारनामा त्याने अरुणाचल संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात केला होता.

यासह त्याने युवराज सिंगचा सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड मोडून काढला होता. टी -२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड हा माजी भारतीय फलंदाज युवराज सिंगच्या नावे होता. युवराज सिंगने टी -२० वर्ल्डकप २००७ स्पर्धेत अवघ्या १२ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. हा रेकॉर्ड इतक्या वर्षांपासून कोणालाच मोडता आला नव्हता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ना सायकल, ना रिक्षा… शाळेत थेट घोड्यावरून, सोलापूरमधील विद्यार्थ्याची हटके स्टाईल; VIDEO

Air India Plane Crash: तू इंधन का बंद केले?, एअर इंडियाचे विमान कोसळण्यापूर्वी दोन्ही पालटमध्ये काय बोलणं झालं होतं?

Toranmal Hill Station : तोरणमाळला आता होम स्टे, जिल्हा प्रशासनाचा नवीन उपक्रम, आदिवासी बांधवांना मिळणार मोठा रोजगार

Panhala To Raigad Travel: पन्हाळा किल्ल्यावरुन रायगडावर कसे जाल? वाचा वेळ आणि बेस्ट रुट

Yashashri Munde : गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, बँक निवडणुकीसाठी भरला अर्ज

SCROLL FOR NEXT