Arjun Tendulkar in IPL 2023, Rohit Sharma SAAM TV
Sports

Arjun Tendulkar Dream Debut In IPL: अर्जुन तेंडुलकरला MI च्या Playing 11 मध्ये घेणार का? रोहित शर्मानं दिलं हे उत्तर

Arjun Tendulkar in IPL 2023 : यंदाच्या मोसमात अर्जुनला मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर आता खुद्द कर्णधार रोहित शर्मानं दिलं आहे.

Nandkumar Joshi

Arjun Tendulkar in IPL 2023 : आयपीएल २०२३ स्पर्धेला उद्या, ३१ मार्चपासून सुरुवात होत आहे. आयपीएल जेतेपदासाठी सर्वच संघातील खेळाडू मैदानावर घाम गाळत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणखी एका जेतेपदासाठी कसून सराव करत आहे. मुंबई इंडियन्सचा युवा ऑलराउंडर अर्जुन तेंडुलकर सुद्धा मेहनत घेत आहे. यंदाच्या मोसमात अर्जुनला मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर आता खुद्द कर्णधार रोहित शर्मानं दिलं आहे.

आयपीएलची चर्चा तर होतेच. त्यातल्या धुरंधर खेळाडूंकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असतं. त्यात मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाच्या कामगिरीकडे लागलं आहे. पण क्रिकेटचं वेड असलेल्या अवघ्या तरुणाईला एकच प्रश्न पडला आहे तो म्हणजे अर्जुन तेंडुलकरला यंदा मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये घेणार का? तर या प्रश्नाचं उत्तर स्वतः रोहित शर्मानं दिलं आहे.

अर्जुन तेंडुलकरला संधी मिळेल का? या प्रश्नावर रोहित शर्मानं उत्तर दिलं आहे. तो म्हणाला, 'चांगला प्रश्न आहे. ते अपेक्षित होतेच.' तो म्हणाला, की अर्जुनने आपल्या गोलंदाजीने सगळ्यांनाच प्रभावित केले आहे. जर त्याची या मोसमासाठी तयारी झाली असेल तर निश्चितच त्याच्या निवडीवर विचार केला जाईल.

यावेळी मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक मार्क बाउचर देखील उपस्थित होता. मार्क बाउचर म्हणाला की, तो दुखापतीतून सावरत आहे. तो सराव करण्यासाठी मैदानात येणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो चांगला खेळत असल्याचे मला तरी वाटते. विशेषतः गोलंदाजी चांगली करत आहे. त्यामुळे मला तरी असे वाटते की त्याला संधी मिळू शकते. जर आम्ही त्याची निवड करू शकत असू, तर आमच्यासाठी ती खूप चांगली बाब असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Kitchen Hacks : आलं महिनाभर ताजं ठेवायचं? मग या सोप्या ट्रिक्स नक्की फॉलो करा

Badlapur Travel : साहसी प्रेमींसाठी पर्वणी बदलापूरमधील 'हे' ठिकाण, येणारा वीकेंड होईल खास

Municipal Elections : धुरळा उडणार! आयोगाची आज महत्त्वाची बैठक, महापालिका निवडणुकीची तारीख आली समोर

Bigg Boss 19 : गौरव खन्ना नाही; तर मग 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोणाचे नाव?

SCROLL FOR NEXT