wtc final  saam tv
क्रीडा

WTC Final: WTC चा अंतिम सामना ड्रॉ झाल्यास कोण होणार वर्ल्ड चॅम्पियन?

WTC Final Weather Report: हा सामना जर ड्रॉ झाला तर कोण विजेता ठरेल? जाणून घ्या.

Ankush Dhavre

IND VS AUS WTC FINAL 2023: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. ७ ते ११ जून दरम्यान हा सामना लंडनमधील ओव्हलच्या मैदानावर पार पडणार आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू जोरदार सराव करताना दिसून येत आहेत. दरम्यान हा सामना जर ड्रॉ झाला तर कोण विजेता ठरेल? जाणून घ्या.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना अनिर्णित राहिला तर?

कसोटी क्रिकेटमध्ये चार निकाल लागतात. पराभव, विजय, ड्रॉ आणि सामना टाय होऊ शकतो. जर अंतिम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना अनिर्णित राहिला तर, दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल. हा निकाल कुठल्याच क्रिकेट चाहत्याला आवडणार नाही. कारण कुठला तरी एक संघ जिंकावा अशीच क्रिकेट चाहत्यांची ईच्छा असणार आहे.

अंतिम सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता..

हा सामना ७ ते ११ जून दरम्यान पार पडणार आहे. तर १२ जून हा रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. मात्र दोन्ही संघांची चिंता वाढवणारी बातमी म्हणजे, या सामन्यादरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. सुरुवातीचे ३ दिवस म्हणजे ७,८,९ ला साधारण पाऊस पडू शकतो. तर १० आणि ११ ला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे नक्कीच क्रिकेट चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे. (Latest sports updates)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ :

भारतीय संघरोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू: यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politcs : सहानभुती संपली, मविआ हारली; आघाडीच्या पराभवाची कारणे काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nawab Malik News : मानखुर्दमध्ये नवाब मलिक यांचा पराभव | Marathi News

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Sujay Vikhe Patil : जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा कार्यक्रम लावला; संगमनेरमधील विजयानंतर सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

SCROLL FOR NEXT