Rohit Sharma's name erased from India's official saam tv
Sports

Rohit Sharma: ज्याची भीती होती ते घडलंच! प्लेईंग ११ नाही तर टीम स्क्वॉडमधूनही रोहितची हकालपट्टी? का होतेय चर्चा?

Rohit Sharma's name erased from India's official: वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली होती. त्यानंतर आता रोहित लवकरच टेस्ट क्रिकेटमधूनही निवृत्ती घेऊ शकतो, अशी चिन्ह दिसतायत.

Surabhi Jayashree Jagdish

सिडनी टेस्टमध्ये चाहत्यांना ज्याची भिती होती ते घडलंच...टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला बॉर्डर - गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या टेस्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने 2024 साली T20 वर्ल्डकप जिंकला होता. वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय चाहत्यांनी ज्या खेळाडूला महान खेळाडूचा दर्जा दिला होता. आज त्याच खेळाडूची टेस्ट कारकीर्द धोक्यात आलीये.

वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली होती. त्यानंतर आता रोहित लवकरच टेस्ट क्रिकेटमधूनही निवृत्ती घेऊ शकतो, अशी चिन्ह दिसतायत. रोहित शर्मा टेस्ट फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे, पण ऑस्ट्रेलियाच्या सततच्या फ्लॉपमुळे त्याने 5 व्या टेस्ट मॅचमध्ये त्याने स्वतःला विश्रांती दिली.

प्रत्येक भारतीय चाहत्यासाठी हा मोठा धक्का होता. मात्र यानंतर चाहत्यांना अजून एक मोठा धक्का बसला तो टीमच्या खेळाडूंची यादी पाहून. या सगळ्यात रोहित शर्मा केवळ प्लेइंग 11 मधूनच बाहेर नाही तर तो संपूर्ण टीममधून बाहेर पडल्याचं दिसून आलं आहे.

टीम स्क्वॉडमधून रोहित शर्मा बाहेर

कोणताही क्रिकेट सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही टीम आपापली टीम शीट जमा करतात. ज्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंशिवाय टीममधील इतर खेळाडूंच्या नावांचाही समावेश आहे. सिडनी टेस्टपूर्वी असेच काहीसं घडलं. दोन्ही टीमने आपापली टीम शीट जाहीर केली.

या टीम शीटमध्ये सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रोहित शर्माचं नाव त्यामध्ये नव्हतं. विश्रांती घेतलेल्या खेळाडूचे नाव टीम लिस्ट शीटबाहेर राहिल्याचं यापूर्वी कधीही घडल नव्हतं. या शीटमध्ये कर्णधाराचे नाव न दिसल्याने सर्वजण आश्चर्य व्यक्त करतायत.

सध्या खराब फॉर्ममध्ये रोहित शर्मा

2024 या वर्षामध्ये रोहित शर्माच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकप जिंकला. यानंतर टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये 2-0 असा विजय मिळवला, पण त्या मालिकेत रोहित शर्मा फ्लॉप ठरला.

याशिवाय रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध ३-० असा पराभव स्वीकारावा लागला होता. या सिरीजमध्येही रोहित शर्मा फलंदाजीत काही विशेष करू शकला नाही. यानंतर आता ऑस्ट्रेलियात 5 डावात केवळ 31 रन्स केले आहेत. अशा स्थितीत टेस्ट क्रिकेटमधील रोहित शर्माचा निवृत्तीचा काळ अगदी जवळ आल्याचं बोललं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुणे पुन्हा हादरलं! मध्यरात्री ५ जणांचा गोळीबार, निलेश घायवाळ टोळीकडून फायरिंग

UPSC Success Story : बस कंडक्टरची लेक पहिल्याच प्रयत्नात IAS झाली, वाचा डॉ. रेनू राज यांचा प्रेरणादायी प्रवास

Navpancham Rajyog: उद्यापासून चमकणार 'या' राशींचं नशीब; बुध-यम यांच्यामुळे नवपंचम राजयोग तयार होऊन मिळणार पैसा

Guru Gochar: 12 वर्षांनंतर गुरु ग्रह बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार चांगली संधी

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

SCROLL FOR NEXT