virat kohli yandex
Sports

Ranji Players Salary: एकाच हंगामात करोडपती? रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या खेळाडूला किती सॅलरी मिळते?

Income Of Ranji Trophy Players: रणजी ट्रॉफी ही देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा आहे. दरम्यान ही स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूला किती मानधन मिळते? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्लॉप ठरल्यानंतर रणजी ट्रॉफी हा चर्चेचा विषय ठरत असतो. कारण मुख्य संघात खेळत असलेले खेळाडू रणजी ट्रॉफी खेळणं टाळतात. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर आता बीसीसीआय अॅक्शन मोडमध्ये आहे.

त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि रिषभ पंत आपल्या संघाकडून रणजी ट्रॉफी खेळताना दिसून येऊ शकतात. जे खेळाडू भारतीय संघाकडून खेळतात, त्यांना बीसीसीआयकडूने कोट्यवधी रुपये दिले जातात, मग रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या खेळाडूंना किती मानधन दिले जाते? जाणून घ्या.

भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना मानधनानूसार ठरलेली रक्कम मिळत असते. मात्र रणजी ट्रॉफीत असं काहीच नसतं. रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या खेळाडूंना सामन्यानुसार मानधन दिलं जातं. एखाद्या खेळाडूचं मानधन, तो किती अनुभवी आहे,यावरुनही ठरत असतं.

रणजी ट्रॉफी खेळणाऱ्यांना किती मानधन मिळते?

जर एखाद्या खेळाडूला ४१ किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळण्याचा अनुभव असेल, तर त्याला दरदिवशी ६० हजार रुपये मिळतात. जर अनुभवी खेळाडूला संघात संधी मिळाली नाही आणि तो राखीव खेळाडू म्हणून खेळत असेल, तर त्याला दरदिवशी ३० हजार रुपये दिले जातात. तर २१ ते ४० सामने खेळण्याचा अनुभव असणाऱ्या खेळाडूंना दरदिवशी ५० हजार रुपये दिले जातात. तर राखीव खेळाडूंना २५ हजार रुपये दिले जातात.

जर एखादा खेळाडू नवीन असेल आणि त्याला २० पेक्षा कमी सामना खेळण्याचा अनुभव असेल, तर अशा खेळाडूला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळाल्यास दरदिवशी ४० हजार रुपये दिले जातात. जर संघात स्थान मिळालं नाहीतर, त्याला २५ हजार रुपये दिले जातात. एखादा खेळाडू जर रणजी ट्रॉफी स्पर्धेतील संपूर्ण हंगाम खेळणार असेल, तर त्याची एकूण ७५ लाखांची कमाई होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बारामतीत अवकाळी पावसाला सुरुवात

Actress Khushi Mukherjee: कारला धडकली दुसऱ्याची गाडी; अभिनेत्री फटाके विक्रेत्यावरच संतापली; भररस्त्यात अभिनेत्री मुखर्जीचा राडा

Saam Impact: धुळ्यात दूध भेसळ! साम टीव्हीच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग, FDAच्या अधिकाऱ्यांची कारवाईसाठी धावपळ|VIDEO

PM Kisan Update : पीएम किसान योजनेचे २००० रुपये खात्यात कधी जमा होणार? कोट्यवधी शेतकऱ्यांना दिवाळीत मिळाली गोड बातमी

Rupali Bhosle Photos: निळ्या पैठणी साडीमध्ये रूपालीचा मराठमोळा साज, फोटो पाहाच

SCROLL FOR NEXT