PM Modi Skin Care Routine saam tv
Sports

PM Modi Skin Care Routine: काय आहे पंतप्रधानाचं Skin Care Routine? हरलीन देओलने प्रश्न विचारताच मोदींचं भन्नाट उत्तर

PM Modi skin care routine Harleen Deol: भारताच्या महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू हरलीन देओल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील एका संवादाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. यावेळी हरलीनने पंतप्रधानांच्या स्किन केअर रूटीवर प्रश्न केला

Surabhi Jayashree Jagdish

नुकतंच टीम इंडियाने विमेंस आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप जिंकला. हा वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सध्या या भेटीचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या भेटीमध्ये टीम इंडियाची फलंदाज हरलीन देओलने पंतप्रधानांना असा प्रश्न विचारला की, संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला.

हरलीन देओलने घेतला इंटरव्ह्यू

वर्ल्डकप विजयाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत वातावरण भावनिक असतानाच खूपच हलकंफुलकं आणि मजेशीर होतं. यावेळी हरलीन देओलचं एनर्जी आणि टीमचं मनोबल वाढवण्यासाठी असलेल्या भूमिकेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं. त्याच वेळी हरलीनने हसत-हसत एक प्रश्न विचारला “सर, तुमचं स्किन केअर रूटीन काय आहे?” या अनपेक्षित प्रश्नावर संपूर्ण हॉलमध्ये हास्याची लाट उसळली.

पंतप्रधान मोदींचं विनोदी उत्तर

हरलीनच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदींनाही हसू आवरलं नाही. यावेळी त्यांनी अत्यंत सहजतेने उत्तर दिलं, “मी याबद्दल विचारच करत नाही. त्यांच्या या साध्या उत्तरावर उपस्थित सर्वजण हसले. त्याच वेळी टीममधील खेळाडू स्नेह राणाने मिश्कीलपणे म्हटलं, “सर, कोट्यवधी भारतीयाचं देशप्रेम आहे!” यावर पुन्हा एकदा हशा पिकला.

कोच अमोल मझुमदार यांची मिश्कील टिप्पणी

टीमचे कोच अमोल मझुमदारही या गमतीशीर वातावरणात मागे राहिले नाहीत. त्यांनी हसत म्हटलं, “सर हेच ते खेळाडू आहेत ज्यांच्याशी मला रोज झगडावं लागतं… त्यामुळेच माझे केस पांढरे झाले आहेत.” त्यांच्या या विनोदावर पंतप्रधान मोदी आणि संपूर्ण टीम पुन्हा एकदा जोरजोरात हसू लागली.

इंग्लंड दौऱ्यावरील किस्साही केला शेअर

या प्रसंगी कोच मझुमदार यांनी इंग्लंड दौऱ्याशी संबंधित एक भावनिक आठवणही शेअर केली. त्यांनी सांगितलं की, त्या वेळी खेळाडूंना किंग चार्ल्स यांच्यासोबत फोटो काढण्याची संधी मिळाली होती. पण प्रोटोकॉलमुळे संपूर्ण टीम एकत्र फ्रेममध्ये येऊ शकला नाही. तेव्हा एका खेळाडूने हसत म्हटलं होतं, “काही हरकत नाही, आपण हा क्षण वर्ल्ड कप जिंकल्यावर आणि पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी जपून ठेवू.” आणि ती गोष्ट खरी ठरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीला राळेगण सिद्ध येथे दाखल..

प्रोफेशनल कोर्सेसमधून 10,000 कोटींची लूट? विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ, शुल्कनियमक प्राधिकरणावर गंभीर आरोप

Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा अजित पवारांना दे धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Shukra Gochar 2026: 12 महिन्यांनी शुक्र करणार शनीच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Best Sleeping Time: वयानुसार तुम्ही किती तास झोपले पाहिजे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT