Rohit sharma reaction after virat century saam v
Sports

IND vs SA: विराटच्या शतकानंतर ड्रेसिंग रूममधून रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला होता? अखेर अर्शदीप सिंहने केला खुलासा

Rohit sharma reaction after virat century: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अलीकडील सामन्यात शानदार शतक झळकावले. त्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये कर्णधार रोहित शर्माने दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली होती. अखेर अर्शदीप सिंगने याबाबतचे रहस्य उघड केले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

रविवारी झालेल्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे सामन्यात विराट कोहलीने सेंच्युरी झळकावली. 52वे वनडे शतक झळकावून टीकाकारांना गप्प केलं. त्यावेळी फक्त चाहतेच नव्हे तर भारतीय डगआउटमध्येही खेळाडू कोहलीच्या शतकाचा आनंद साजरा करत होते. टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माला देखील प्रचंड आनंद झाला. यावेळी तो टाळ्या वाजवत काहीतरी बोलत होता.

अनेकांनी अंदाज लावला की, रोहितने आनंदाच्या भरात शिवीही दिली. पण रोहित शर्मा नेमकं काय बोलला हे स्पष्ट झालं नव्हतं. सेंच्युरीचा आनंद साजरा करताना रोहितच्या बाजूला अर्शदीप सिंह उभा होता. यानंतर आता एका व्हिडिओमध्ये अर्शदीप सिंहने या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.

कोहलीच्या शतकावर रोहितचं रिएक्शन व्हायरल

रांचीमध्ये कोहलीने अप्रतिम खेळ करत 120 बॉल्समध्ये 11 चौकार आणि 7 षटकारांसह 135 रन्स केले. यामुळे भारताने 349 रन्सचा मोठा स्कोअर उभारला. शिवाय यावे कोहलीने रोहितसोबत दुसऱ्या विकेटसाठी 136 रन्सची भागीदारी केली. या दोन दिग्गजांनी गोलंदाजांना चांगलेच धारेवर धरत मास्टरक्लास दाखवला. रोहितच्या विकेटनंतर कोहलीच्या शतकावर तो अतिशय उत्साहित दिसत होता. यावेळी त्याने दिलेली रिएक्शन व्हायरल झालीये.

अर्शदीप सिंहने दिलं उत्तर

गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर रोहितने नेमके काय म्हटलं याचा शोध चाहत्यांकडून घेतला जातो. अखेर अर्शदीपने यावर उत्तर दिलंय, पण मजेशीर अंदाजात. त्याने नेमके शब्द सांगण्याचं टाळलं

अर्शदीपने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने म्हटलंय की, “मला अनेक मेसेज येतायत की रोहितने विराटच्या शतकानंतर काय म्हटलं. तर मी सांगतो की रोहित म्हणाला, ‘नीली परी, लाल परी, कमरे में बंद, मुझे नादिया पसंद.’” ही क्लिप नंतर पंजाब किंग्सने इंस्टाग्रामवर पोस्ट केली.

रोहित-कोहलीच्या भविष्यावर अजूनही प्रश्नचिन्ह

या वर्षाच्या सुरुवातीला रोहित आणि विराटने टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय भविष्यावर आणि 2027 वर्ल्ड कपमधील खेळण्यावर पुन्हा चर्चा सुरू आहे. काही अहवालांनुसार, त्यांना विजय हजारे ट्रॉफी खेळण्यास सांगितलं जाऊ शकतं, जेणेकरून त्यांची लय कायम राहील.

तर दुसऱ्या अहवालात असं नमूद करण्यात आलं की, बीसीसीआय अधिकारी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्यासोबत बैठक घेऊन या दोन्ही दिग्गजांच्या भविष्यावर निर्णय घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fort : किल्ला, समुद्र अन् हजारो फ्लेमिंगो; मुंबईतील 'या' ठिकाणाचं सौंदर्य मन मोहून टाकतं!

Diabetes Diet: डायबिटीजच्या रुग्णांसाठी 'ही' भाजी ठरू शकते फायदेशीर; ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी नक्की खा

Maharashtra News Live Update: धुळे सोलापूर महामार्गवर पुन्हा मराठा आंदोलकांनी रस्ता अडवला

सत्ताधारी पक्षातील नेत्याची भररस्त्यात हत्या; कार्यालयात जाताना सहा जणांच्या टोळीने घेरलं अन्...

विंचू आणि साप चावण्यात नेमका काय फरक? पावसाळ्यात या घटना का वाढतात, जाणून घ्या महत्त्वाची माहिती!

SCROLL FOR NEXT