Rohit Tilak and Surya saam tv
Sports

Rohit Sharma: रात्रीच्या अंधारात रोहित, तिलक आणि सूर्याने हे काय केलं? Video लीक झाल्याने चाहतेही हैराण

Rohit Tilak Surya Video : सध्या मुंबई इंडियन्सचा संघ दुसऱ्या लढतीसाठी गुजरातमध्ये दाखल झाला आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर रंगणार आहे. या सामन्याआधी मुंबईचे खेळाडू मौजमजा करताना दिसून येत आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. यावेळी टीमला पहिल्याच सामन्यात सामना चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. आता मुंबई इंडियन्सची टीम दुसऱ्या सामन्यासाठी गुजरातमध्ये आहे. मुंबई इंडियन्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामना नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी मुंबईचे खेळाडू मजामस्ती करताना दिसतायत.

गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावेळी तिन्ही खेळाडू एका व्यक्तीला उचलून स्विमिंग पूलमध्ये फेकताना दिसतायत.

रोहित-सूर्याने कोणाला फेकलं स्विमिंग पूलमध्ये?

व्हायरल झालेला व्हिडिओ मुंबई इंडियन्स टीम जिथे सध्या राहतेय त्या हॉटेलचा आहे. व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यासोबत एक गार्ड देखील दिसून येतोय. हे खेळाडू त्या व्यक्तीला उचलून स्विमिंग पूलजवळ आणतात आणि तिथे फेकून देतात. व्हायरल व्हिडिओमध्ये असा दावा केला जातोय की, ज्या व्यक्तीला सर्वजण उचलून पाण्यात फेकतायत तो मुंबई इंडियन्सचा सोशल मीडिया अॅडमीन आहे.

मुंबई अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत

शनिवारी २९ मार्च रोजी मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० वाजता खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्सप्रमाणे गुजरात टायटन्सनेही त्यांचा पहिला सामना गमावला आहे. दोन्ही टीममधील हा दुसरा सामना आहे. त्यामुळे दोन्ही टीम्स जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे.

हार्दिक पंड्याचं होणार कमबॅक

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सची फलंदाजी अपयशी ठरली. या सामन्यात हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. या सामन्यात पंड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे आता गुजरात विरूद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याचं कमबॅक होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT