chris gayle saam tv
क्रीडा

ख्रिस गेलची आयपीएलमध्ये पुन्हा एन्ट्री; 'या' संघासाठी खेळणार ?

ख्रिस गेलने धडाकेबाज फलंदाजी करुन आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे.

नरेश शेंडे

मुंबई : क्रिकेटविश्वात 'युनिव्हर्सल बॉस' अशी ख्याती असलेला वेस्टइंडिजचा (West Indies) स्टार प्लेयर ख्रिस गेल (chris gayle) आयपीएलच्या १५ व्या मोसमात खेळत नाहीय. खरतंर, यंदाच्या हंगामात ख्रिस गेलनेच त्याच्या नावाचा समावेश न केल्याने तो मेगा ऑक्शनमध्ये (Mega Auction) सामील नव्हता. ख्रिस गेलने धडाकेबाज फलंदाजी करुन आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. परंतु, यावर्षीच्या हंगामात गेल खेळत नसल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे. गेल सारखा दिग्गज खेळाडू (IPL 2022) आयपीएल २०२२ मध्ये का खेळत नाहीय, याबाबत क्रिकेट प्रेमींकडून अनेक अंदाज बांधले गेले होते. मात्र, आता खुद्द ख्रिस गेलनेच याबाबत खुलासा केला आहे. आयपीएलच्या गेल्या काही मोसमात अपेक्षित असा सन्मान न मिळाल्याने गेलने नाराजी व्यक्त कोलीय. दरम्यान, आगामी होणाऱ्या आयपीएलच्या स्पर्धांमध्ये खेळण्याची इच्छाही गेलनं माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

पंजाबच्या प्लेईंग ११ मध्ये गेलचा समावेश नाही

वेस्टइंडिजचा धुवांधार फलंदाज ख्रिस गेल आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर बॅंगलोर आणि पंजाब किंग्जच्या संघासाठी खेळला आहे. २०१९ च्या आयपीएलच्या हंगामात ख्रिस गेल कमालीचा फॉर्ममध्ये होता. सर्वाधीक धावसंख्या करणाऱ्या खेळाडू्ंच्या यादीत तो सहाव्या नंबरवर होता.मात्र, २०२०-२१ मध्ये गेलने चमकदार कामगिरी केली नाही. त्यामुळे पंजाबच्या प्लेईंग ११ मध्ये निवड होणं गेलसाठी कठीण झालं. गेलने मागील सिजनमध्ये १० सामने खेळले होते.त्यावेळी गेलने १२५.३२ च्या सरासरीनं १९३ धावा केल्या होत्या. तर २०२२ च्या मोसमात गेलने फक्त ७ सामने खेळून २८८ धावांची खेळी केली. ख्रिस गेलने आयपीएलमध्ये आतापर्यंत १४२ सामने खेळले असून ४९६५ धावा कुटल्या आहेत.विशेष म्हणजे गेलच्या नावावर टी-२० मध्ये वैयक्तीक १७५ धावांचा ठोकण्याचा विक्रम आहे. २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सच्या लढतीत गेलने हा विक्रम केला होता.

माझ्यासोबत चांगला व्यवहार झाला नाही

ख्रिस गेल माध्यमांशी बोलताना म्हणाला, गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये माझ्यासोबत चांगला व्यवहार केला गेला नाही. आयपीएलमध्ये एवढं सगळं करुन देखील मला माझ्या हक्काप्रमाणे सन्मान मिळाला नाही. त्यामुळे मेगा ऑक्शनमध्ये नाव न देण्याचा निर्णय मी घेतला.क्रिकटनंतरही जीवन सुंदर असतं.दरम्यान, क्रिकेटविषयी बोलताना गेल म्हणाला, मी पुढच्या वर्षी पुनरागमन करेल. त्यांना माझी गरज आहे.आयपीलमध्ये केकेआर, आरसीबी आणि पंजाबच्या टीमसाठी मी खेळलो आहे. मला आरसीबी आणि पंजाबला अजिंक्यपद मिळवून द्यायला नक्कीच आवडेल. दोन्ही संघांसाठी मी अप्रतिम कामगिरी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT