West Indies Pacer Shannon Gabriel Retirement Google
Sports

वेगवान गोलंदाजाचा क्रिकेटला अलविदा; 12 वर्षांच्या कारकिर्दीला दिला पूर्णविराम!

West Indies Pacer Shannon Gabriel Retirement: शेननने त्याच्या १२ वर्षांच्या क्रिकेट करियरला ब्रेक देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर ग्रेबियलच्या निर्णयानुसार तो आता जगभरात खेळल्या जाणाऱ्या क्लब आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्ये त्रिनिदाद अँड टोबॅगो टीमचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

West Indies Pacer Shannon Gabriel Retirement: वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शेन गेब्रियलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीये. शेननने त्याच्या १२ वर्षांच्या क्रिकेट करियरला ब्रेक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. २०१२ साली ग्रेबियलने वेस्टइंडिजसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी डेब्यू केला होता.

निवृत्तीबाबत काय म्हणाला गेब्रियल?

गेब्रियलने त्याच्या रिटायरमेंटबाबतच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय की, गेल्या १२ वर्षांपासून मी संपूर्ण निष्ठेने वेस्ट इंडिजसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलंय. सर्वांना लोकप्रिय असलेला हा खेळ उच्च स्तरावर खेळण्याचा अनुभव चांगला आहे. परंतु म्हणतात ना, सर्व चांगल्या गोष्टींचा अंत होतो. आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतो."

गेब्रियलने यावेळी त्याच्या स्टेटमेंटमध्ये देवाचे आभार मानले आहेत. त्याला देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने त्याने देवाचे आभार मानले आहेत. याशिवाय त्याने आपलं कुटुंब, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड, सपोर्ट स्टाफ आणि प्रशिक्षकांना देखील धन्यवाद दिले आहेत. त्याने आपल्या टीममधील इतर खेळाडूंचेही मनापासून आभार मानले

फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये खेळणार शेनन?

आता निवृत्तीनतंर शॅनन गॅब्रिएल काय करणार असा प्रश्न सर्व चाहत्यांच्या मनात आहे. त्याने नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून यावेळी त्याने त्याच्या पुढच्या प्लॅनबद्दलही सांगितलं आहे. ग्रेबियलच्या निर्णयानुसार तो आता जगभरात खेळल्या जाणाऱ्या क्लब आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्ये त्रिनिदाद अँड टोबॅगो टीमचे प्रतिनिधित्व करणार आहे.

कशी आहे गेब्रियलची आंतरराष्ट्रीय कारकिर्द?

शेनन गॅब्रिएलला टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक यश मिळाल्याचं दिसून आला. जिथे त्याने त्याची उंची आणि गोलंदाचीच्या वेगाने पुरेपुर फायदा घेतला. वेस्ट इंडिजकडून खेळलेल्या 59 टेस्ट सामन्यांमध्ये त्याच्या नावे 166 विकेट्स आहेत. त्याने 25 वनडे सामन्यांमध्ये त्याने वेस्ट इंडिजचं प्रतिनिधित्व केलं. याशिवाय त्याने 33 विकेट्स घेतल्या. तर दुसरीकडे शेननला परंतु टी-20 क्रिकेटमध्ये त्याला फारशी संधी मिळाली नाही. 125 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 331 विकेट आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : लोणावळा हादरलं! तरूणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, तिघांचे लाजिरवाणं कृत्य

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Sunday Horoscope : तुमचा निर्णय अचूक ठरणार, अडचणींवर मात करणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT