we are rich people we don't go to poor countries for other leagues virender sehwag replied on adam glichrist question amd2000 twitter
क्रीडा

Virender Sehwag: 'आम्ही इतके गरीब नाही..', गिलख्रिस्टच्या त्या प्रश्नावर सेहवागचं रोखठोक उत्तर

Virender Sehwag -Adam Gilchrist: अॅडम गिलख्रिस्टने विचारलेल्या प्रश्नावर वीरेंद्र सेहवागने रोखठोक उत्तर दिलं आहे.

Ankush Dhavre

भारतात सध्या आयपीएल २०२४ स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत जगभरातील खेळाडू सहभाग घेत असतात. ज्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकासारख्या बलाढ्य संघातील खेळाडूंचा देखील समावेश असतो. ही स्पर्धा सुरु असताना हे खेळाडू इतर कुठल्याही मालिकेत किंवा स्पर्धेत खेळताना दिसून येत नाहीत.

आयपीएलप्रमाणेच जगभरात बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग, बांग्लादेश प्रीमियर लीग आणि पाकिस्तान सुपर लीगसारख्या स्पर्धा होत असतात. परदेशी खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी भारतात येत असले तरीदेखील भारतीय खेळाडू कधीच टी-२० लीग स्पर्धा खेळण्यासाठी दुसऱ्या देशात जात नाहीत. याबाबत अॅडम गिलख्रिस्टने प्रश्न विचारला असता, वीरेंद्र सेहवागने मजेशीर उत्तर दिलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट आणि भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने एका ऑनलाईन मुलाखतीत सहभाग घेतला. या मुलाखतीत गिलख्रिस्टने सेहवागला विचारलं की, ' भारतीय खेळाडू इतर लीग स्पर्धा खेळू शकतील का? या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला की, ' नाही, का?.. आम्ही श्रीमंत आहोत, आम्ही गरीब देशात जाणार नाही.' हे उत्तर दिल्यानंतर तो हसू लागला. बीसीसीआय कुठल्याच भारतीय खेळाडूला परदेशात जाऊन परदेशी लीग खेळण्याची अनुमती देत नाही. हे खेळाडू इंग्लंडमध्ये जाऊन काऊंटी क्रिकेट खेळू शकतात.मात्र टी-२० लीग स्पर्धांमध्ये खेळता येत नाही. एकदा खेळाडू निवृत्त झाल्यानंतर तो या स्पर्धा खेळू शकतो.

वीरेंद्र सेहवागने आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. या संघात त्याने सलामीवीर म्हणून यशस्वी जयस्वालला स्थान दिलं आहे. तर यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला आहे.

अशी आहे सेहवागने निवडलेली प्लेइंग ११..

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, रिंकू सिंग/शिवम दुबे, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, संदीप शर्मा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

SCROLL FOR NEXT