WCL 2025 IND Vs PAK  Saam Tv
Sports

WCL 2025 IND Vs PAK : युवराज, हरभजन सिंगमुळे पाकिस्तानला मोठा झटका!सेमीफायनलमध्ये खेळण्यास भारताचा नकार

WCL 2025 IND Vs PAK Match Boycott: भारतीय क्रिकेट संघाने मोठा निर्णय घेतला आहे. भारताने पाकिस्तानविरोधात सामना खेळण्यास नकार दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये सेमीफायनलचा सामना खेळण्यास भारताने नकार दिला आहे. सेमीफायनच्या सामन्यावर इंडिया चॅम्पियन्स संघाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हा सेमीफायनलचा सामना पाकिस्तान चॅम्पियन्सविरुद्ध होणार होता. परंतु पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय खेळाडूंनी हा निर्णय घेतला आहे.

याआधीही अनेकदा भारतीय खेळाडूंनी लीग सामन्यात पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. या निर्णयामुळे पाकिस्तान आता थेट अंतिम फेरीत पोहचला आहे. भारताने माघार घेतल्यामुळे पाकिस्तानचा फायनलमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे दोन्ही संघ बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन क्रिकेट मैदानात एकमेकांसमोर येणार होते.

निवेदनात काय म्हटलं?

WCL ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयोजकांनी उपांत्य फेरीतून माघार घेण्याच्या निर्णयाबद्दल आदर व्यक्त केला आहे. सामना रद्द करण्यात आला आहे आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करतील याची माहिती दिली.

निवेदनात म्हटलंय की, डब्लूसीएलमध्ये, आम्ही नेहमीच खेळाच्या शक्तीवर विश्वास ठेवला आहे. यामुळे जगात सकारात्मक बदलून आणला जातो. आम्ही नेहमीच लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. आम्ही जे काही करते ते आमच्या प्रेक्षकांसाठी आहे. आम्ही इंडिया चॅम्पियन्सच्या सेमीफायनलमधून माघार घेण्याच्या निर्णयाचा आदर करतो. सर्व घटकांचा विचार करुन इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यातील सामना रद्द करण्यात आला आहे.

भारतीय खेळांडूनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास दिला नकार

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, शिखर धवन, इरफान पठाण, हरभजन सिंग, युवराज सिंग, सुरेश रैना यांच्यासह अनेक खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्द फेरीच्या सामन्यात खेळण्यास नकार दिला होता. या स्पर्धेच्या सुरुवातीलाच भारतीय संघाने ही भूमिका घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याच्या दरवाढीचा स्फोट, एका दिवसात प्रति तोळा ११,७७० रुपयांची वाढ; वाचा आजचे २२ अन् २४ कॅरेटचे दर

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : अजित पवारांच्या पार्थिवावर काहीच वेळात होणार अंत्यसंस्कार

Pilot Salary: विमान चालवणाऱ्या पायलटचा पगार किती असतो? जाणून घ्या

Baby Clothes Tips : लहान मुलांच्या कपड्यांना येणारा तेलाचा वास कसा दूर करावा? जाणून घ्या टिप्स

Tirgrahi Yog: 200 वर्षांनंतर या राशींवर पडणार पैशांचा पाऊस; त्रिग्रही राजयोगाने होणार मालामाल

SCROLL FOR NEXT