Glenn Phillips Bat Broke Viral Video SAAM TV
Sports

VIDEO VIRAL: बॉलरनं बुलेटच्या वेगानं फेकला चेंडू; फलंदाजाच्या बॅटचे तुकडे-तुकडे

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात हा प्रकार घडला.

Nandkumar Joshi

Pak vs NZ Final Match : पाकिस्तानच्या क्रिकेट संघानं फायनलमध्ये यजमान न्यूझीलंडला पाच विकेटने पराभूत करून टी-२० तिरंगी मालिका जिंकली. आगामी टी २० वर्ल्डकपसाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, असंच त्यांनी या विजयातून दाखवून दिलं. मात्र, या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजानं करिश्मा दाखवला. पाकिस्तानचा तेजतर्रार गोलंदाज हारिस रउफ यानं बुलेटच्या वेगानं चेंडू फेकला. त्यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजाच्या बॅटचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाले. (Cricket News)

टी २० वर्ल्डकप (T 20 World Cup) १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होत आहे. या मोठ्या स्पर्धेआधीच पाकिस्ताननं तिरंगी मालिका खिशात घालून वर्ल्डकप विजेतेपदाचे दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रउफनं जादुई चेंडू फेकला. बुलेटच्या वेगानं फेकलेल्या या चेंडूने फलंदाजाची बॅट तुटली. (Tajya Batmya)

हारिस रउफनं न्यूझीलंडचा डाव सुरू असताना सहाव्या षटकातील चौथा चेंडू १४३ किलोमीटर प्रतितास वेगाने फेकला. स्ट्राइकला असलेला ग्लेन फिलिप्सच्या बॅटच्या खालच्या भागाला चेंडू लागला. त्यानंतर बॅटचे तुकडे झाले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

(हा व्हिडिओ एकदा बघाच)

दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानने १६४ धावांचा पाठलाग करताना यष्टीरक्षक सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवान (३४ धावा) आणि कर्णधार बाबर आझम (१५ धावा) यांच्यासह शान मसूद १९ धावा यांनी ७४ धावांवर आपली विकेट गमावली होती. मात्र, नवाझने २२ चेंडूंत ३८ धावा आणि हैदर अली याने १५ चेंडूत ३१ धावा, इफ्तिखारने १४ चेंडूंवर नाबाद २५ धावांच्या जोरावर न्यूझीलंडला पराभूत केले. इफ्तिखारने ब्लेयर टिकनरच्या चेंडूवर विजयी षटकार लगावला.

न्यूझीलंडने ७ बाद १६३ धावा केल्या

तत्पूर्वी, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट गमावून १६३ धावा केल्या. कर्णधार केन विलियम्सन याने ३८ चेंडूंत ५९ धावा केल्या. त्यात चार चौकार आणि दोन षटकार होते. ग्लेन फिलिप्स याने २९ आणि चॅपमॅन याने २५ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि हारिस रउफ याने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT