Ruturaj Gaikwad Pushed Groundsman During M Chinnaswamy stadium Bengaluru Match
Ruturaj Gaikwad Pushed Groundsman During M Chinnaswamy stadium Bengaluru Match  SAAM TV
क्रीडा | IPL

VIDEO: भारताच्या स्टार फलंदाजानं ग्राउंड्समनला का ढकललं? सोशल मीडियावर धुलाई

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत भारतीय संघाचा सलामीवीर आणि स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याचा अपेक्षित फॉर्म दिसला नाही. त्यामुळे आगामी टी-२० विश्वकप स्पर्धेसाठी त्याची निवड होणे कठीण असल्याचे मानले जात आहे.

त्याचवेळी ऋतुराजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात तो पव्हेलियनमध्ये बसला असून, ग्राउंड्समनला धक्का देताना दिसत असल्याचं दिसतं. पण खरंच त्यानं धक्का दिला का, हा खरा प्रश्न आहे. सोशल मीडियावर काहींना ते खटकलं. त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. (India Vs South Africa)

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेतील अखेरच्या आणि निर्णायक सामन्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. पाचवा सामना जिंकून मालिकाविजय मिळवण्याचं भारताच्या (Team India) स्वप्नावर काल, रविवारी पावसानं पाणी फेरलं. त्यामुळं मालिका २-२ अशी अनिर्णित राहिली.

या सामन्यादरम्यान पाऊस सुरू असताना, पव्हेलियनमधील सलामीवीर ऋतुराज गायकवाड याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात तो हेल्मेट, पॅड आणि ग्लोव्ह्ज घालून हातात बॅट घेत डगआऊटमध्ये बसलेला दिसत आहे. त्याचवेळी एक ग्राउंड्समन त्याच्या जवळ येऊन बसतो आणि सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी गायकवाड त्याला हात लावून दूर जाण्यास सांगताना दिसत आहे.

ऋतुराजची ही कृती कॅमेऱ्यात टिपली गेली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर सडकून टीका करण्यास सुरुवात केली.

ऋतुराजच्या पाच इनिंगमध्ये ९६ धावा

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेत सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं पाच इनिंगमध्ये ९६ धावा केल्या. त्याची फलंदाजीची सरासरी १९.२० आहे. ५७ धावांची खेळी ही सर्वोत्तम होती. या संपूर्ण मालिकेत गायकवाडने ९ चौकार आणि पाच षटकार लगावले आहेत. सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर भारतानं विशाखापट्टणम आणि राजकोटमध्ये विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली.

बेंगळुरूत १० धावा करून ऋतुराज झाला बाद

भारतीय संघाचं दक्षिण आफ्रिका विरुद्ध मायदेशात मालिका जिंकण्याचं स्वप्न अपुरं राहिलं. टीम इंडियानं दक्षिण आफ्रिका विरुद्ध अद्याप मायदेशात टी-२० मालिका जिंकलेली नाही. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या हातून ही संधी पावसामुळं निसटली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT