Wasim Akram On Angelo Mathews Time Out Wicket twitter
Sports

Angelo Mathews: 'त्याने जे केलंय ते नियमात..', अँजेलो मॅथ्यूजच्या टाईम आऊटवर वसीम अक्रम काय म्हणाला?

Wasim Akram On Angelo Mathews Time Out Wicket: या विकेटवर पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू वसीम अक्रमने मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

Wasim Akram On Angelo Mathews Time Out Wicket:

श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात अँजेलो मॅथ्यूजला टाईमआऊट करण्यात आलं आहे. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट होणार तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.

या प्रकरणावर अनेक दिग्गज खेळाडूंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने देखील यावर आपलं मत मांडलं आहे.

वसीम अक्रमने म्हटले की, 'शाकिबने जे केलंय ते नियमात आहे. पण त्याने जर खेळ भावनेचा विचार केला असता तर असं केलं नसतं. मी खरं सांगू तर त्याने हे संघासाठीच केलं असावं. मी जर त्याच्या जागी असतो तर मी विचार केला असता की याने माझ्या संघाचा फायदा होणार आहे का? मात्र कर्णधार म्हणून मी सर्व बाबींचा विचार केला असता. मी ही अपील मागे घेतली असती. इथे शाकिबने संघाचा विचार करुन हा निर्णय घेतला आहे. आयसीसीचा नियम आहे आणि अंपायर्सने देखील विचार करून निर्णय घेतला.' (Latest sports updates)

तसेच तो पुढे म्हणाला की, 'यात कुठलीच शंका नाही की, शाकिबने ही अपील मागे घ्यायला हवी होती. मात्र हा त्याचा निर्णय आहे जो त्याने नियमात राहुन घेतला आहे. आता याबाबत चर्चा करुन काही फायदा नाही.'

अँजेलो मॅथ्यूज काय म्हणाला?

मी यापूर्वी शाकीब अल हसन आणि बांगलादेश संघाचा सन्मान करायचो. मात्र यापुढे असं काहीच नसेल. मी वेळ वाया घालवत नव्हतो. सर्वांना दिसलं की, मी क्रीझवर आलो होतो. पण माझ्या हेल्मेटचा बेल्ट तुटला होता. शाकीब आणि बांगलादेश संघाने केलेलं हे कृत्य लज्जास्पद आहे. अशाप्रकारचं क्रिकेट खेळणं लज्जास्पद आहे. बांगलादेश सोडून इतर कुठलाही संघ असं करेल असं मला वाटत नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

Maharashtra Live News Update: जांभोरा येथील पाझर तलाव फुटला, शेतीचे मोठं नुकसान

Janhvi Kapoor: चंद्रावाणी मुखडा तिचा...; जान्हवी कपूरचा दहीहंडी स्पेशल लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT