rcb  saam tv
Sports

RCB VS DC IPL 2023: RCB ची ताकद दुपटीने वाढली! २ दिग्गज खेळाडूंचे संघात जोरदार कमबॅक

Josh Hazlewood And Wanindu Hasaranga Comeback: सामना सुरु होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला गुड न्यूज मिळाली आहे.

Ankush Dhavre

RCB VS DC LIVE UPDATES: आयपीएल २०२३ स्पर्धेतील २० वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. हा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे.

दरम्यान हा सामना सुरु होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला गुड न्यूज मिळाली आहे. या संघात २ धाकड खेळाडूंची एंट्री झाली आहे.

या आठवड्यात श्रीलंकेचा दिग्गज फिरकी गोलंदाज वनिंदू हसरंगा आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड रॉयल चॅलेंजर्स बांगुळूर संघात परतला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात फाफ डू प्लेसिस या दोघांनाही प्लेइंग ११ मध्ये संधी देऊ शकतो. या दोन्ही खेळाडूंच्या पुनरागमनामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आणखी मजबूत होणार आहे.

वनिंदू हसरंगा न्यूझीलंड संघाविरुद्व टी -२० मालिका खेळण्यात व्यस्त होता. त्यामुळे तो सुरुवातीचे काही सामने खेळू शकला नव्हता. तर जोश हेजलवूड दुखापतीमुळे संघाबाहेर होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. (Latest sports updates)

वनिंदू हसरंगा बद्दल बोलायचं झालं तर, या मिस्ट्री गोलंदाजाचा सामना करणं कुठल्याही फलंदाजासाठी सोपं नसणार आहे. कारण हसरंगाचा चेंडू कधी कुठे फिरेल हे काहीच सांगता येत नाही. तर वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. हेजलवूडने २४ सामन्यांमध्ये ३२ गडी बाद केले आहेत. तर हसरंगाने १८ सामन्यांमध्ये २६ गडी बाद केले आहेत.

अशी असू शकते रॉयल चॅंलेंजर्स बंगळूरू संघाची प्लेइंग 11

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली/वेन पारनेल, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

SCROLL FOR NEXT