वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग याच्याकडे पहिल्यांदाच संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (DDCA) आर्यवीरची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.
आर्यवीरने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या अंडर-19 संघाकडून पदार्पण केले होते.
आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार खेळ केल्यानंतर वीरेंद्र सेहवागच्या मुलाच्या खांद्या संघाचं नेतृत्त्व देण्यात आलंय. नुकत्याच झालेल्या अंडर 19 भारतीय संघामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आर्यवीर सेहवागचे पदार्पण झाले होते आता त्यानंतर आता त्याला मोठा जबाबदारी देण्यात आलीय. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. आगामी स्पर्धेमध्ये त्याला त्याच्या संघाचे नेतृत्व करायला मिळणार आहे.
विनू मांकड ट्रॉफीसाठी दिल्लीच्या 19 वर्षांखालील पुरुष संघाचा कर्णधार म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आलीय. डीडीसीएकडून संघाचीही घोषणाही केली आहे. डीडीसीएच्या ज्युनियर पुरुष निवड समितीच्या बैठकीनंतर, आर्यवीर सेहवागच्या नेतृत्वाखालील 16 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात अनेक युवा खेळाडूंचाही समावेश असून रन्नव बुग्गा संघाचा उपकर्णधार असणार आहे. ही स्पर्धा 8 ऑक्टोबरपासून विशाखापट्टणम येथे खेळवली जाणार आहे. अंडर 19 संघामध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती आता त्याच्या कॅप्टन्सीवर सर्वांची नजर असणार आहे.
आर्यवीरने आपल्या प्रभावी कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने नुकतेच राजकोट येथे ऑस्ट्रेलिया अंडर-१९ विरुद्धच्या युवा एकदिवसीय सामन्यात चांगली फलंदाजी केली, पण दुर्दैवाने त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तरीही डीडीसीएने त्याच्यावर पुन्हा विश्वास दाखवला असून आता त्याला कर्णधारपद दिले आहे. तो दमदार कामगिरी करून पुनरागमन करण्यास उत्सुक असेल. आर्यवीरने अलीकडेच सांगितले की त्याला क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी करायची आहे.
आर्यवीर सेहवाग (कर्णधार), तन्मय चौधरी, अर्णव बुग्गा (उपकर्णधार), धन्या नाकरा, उदय चावला, गरव कुमार, अभिराज गगनसिंग (विकेटकिपर), तरुण सिंग (विकेटकिपर), आर्यन शर्मा, ओजसदीप सिंग, किरीट कौशिक, वरुण देव वंजानी, राजकुमार शंभू, रौन कुमार, भागवत शंभू, राजेंद्र सिंह. यादव.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.