Virender Sehwag Video X
Sports

Virender Sehwag : खेळण्याची भूक संपलीये, ते आयपीएलमध्ये सुट्टीसाठी येतात, वीरेंद्र सेहवागची परदेशी खेळाडूंवर जहरी टीका

Virender Sehwag Video : भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग सध्या आयपीएल २०२५ मध्ये व्यस्त आहे. तो कॉमेंट्रेटरची भूमिका पार पाडत आहे. याच दरम्यान वीरेंद्र सेहवागचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

भारतासह जगभरामध्ये आयपीएल २०२५ ची धामधुम पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटू आयपीएलमध्ये समालोचन म्हणजेच कॉमेंट्री करत आहेत. यात टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा देखील समावेश आहे. सध्या वीरेंद्र सेहवागच्या एका व्हायरल व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये सेहवागने ग्लेन मॅक्सवेल आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांच्यावर जहरी टीका केली आहे.

क्रिकबझच्या एका चर्चासत्रामध्ये वीरेंद्र सेहवाग म्हणाला, ग्लेन मॅक्सवेल आणि लियान लिव्हिंगस्टोन या खेळाडूंची खेळण्याची भूक संपली आहे. ते आयपीएलच्या निमित्ताने इथे येतात, आयपीएलला सुट्टी समजून मज्जा करतात. संघासाठी लढण्याची, संघाला जिंकवून देण्याची आवड त्यांच्यामध्ये दिसत नाही. ते जिंकण्याबद्दल बोलताना दिसतात, पण ते चांगली कामगिरी करत नाहीत.

'मी अनेक परदेशी खेळाडूंसोबत काम केले आहे. आपल्या संघाला स्पर्धा जिंकू देण्यासाठी उत्सुक असतात अशा अनेक खेळाडूंना मी जवळून ओळखतो. पण ग्लेन मॅक्सवेल आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांच्यात मला अशा प्रकारची खेळण्याची भूक दिसत नाही', असे वक्तव्य वीरेंद्र सेहवागने केले. सोशल मीडियावर वीरूच्या या वक्तव्याची मोठी चर्चा होत आहे.

ग्लेन मॅक्सवेल पंजाब किंग्समधून आयपीएल २०२५ मध्ये सहभागी झाला आहे. त्याने एकूण ६ सामने खेळले आहेत. यात मॅक्सवेलने फक्त ४१ धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट १०० इतका आहे. ग्लेन मॅक्सवेलने फक्त ४ विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या बाजूला, लियान लिव्हिंगस्टोन हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो. त्याने ७ सामन्यांमध्ये फक्त ८७ धावा केल्या आहेत. खराब खेळीमुळे दोघांना मागच्या सामन्याच्या प्लेईंग ११ मधून वगळण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard : पुण्यानगर नगरमध्येही बिबट्याचा हल्ला, ४ वर्षाच्या चिमुकलीचा घेतला बळी

Maharashtra Live News Update: एसटी महामंडळ विकणार पेट्रोल

Bihar Elections : बिहारमध्ये १२१ जागांसाठी आज मतदान, तेजस्वी-सम्राट यांच्यात थेट सामना, तर भाऊ तेज प्रतापची स्वतंत्र लढत

RBI नं विकलं 35 टन सोनं? 60 हजार कोटींचं काय केलं?

Pune : पुणे जिल्ह्यात नरभक्षक झाले बिबटे, नागरिकांमधील दहशत कधी संपणार?

SCROLL FOR NEXT