Virat Kohli Crazy Fan 
Sports

Virat Kohli Fan: अजब चाहत्याचा गजब किस्सा! विराटच्या शतकामुळे बिचाऱ्याचं लग्न झालं, पाहा काय आहे प्रकरण?

विराट कोहलीच्या चाहत्यांची जगभरात कमी नाही, पण या चाहत्याने विराटसाठी चक्क लग्नच करणार नसल्याचा पण केला होता.

Gangappa Pujari

Cricket News: भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आता पुन्हा एकदा त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून विराटच्या फॉर्मने त्याच्या चाहत्यांसह क्रिकेट प्रेमींचे टेंन्शन वाढवले होते. इतकेच नव्हेतर विराटच्या ७१ व्या शतकासाठी अनेक चाहत्यांनी देवाला नवसही केले होते.

आता अशाच एका जबरा चाहत्याच्या लग्नाचा किस्सा समोर आला आहे. या चाहत्याने जोपर्यंत विराटचे ७१ वे शतक होत नाही तोपर्यंत लग्नच करणार नसल्याचा पण केला होता. आता या चाहत्याने लग्न केल्याचीही बातमी समोर आली आहे. (Cricket News)

आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध दमदार शतक ठोकत ७१ व्या शतकाला गवसणी घातली होती. या शतकासाठी चाहत्यांना दोन वर्ष वाट पाहावी लागली होती. 71 व्या शतकापर्यंत पोहोचल्यानंतर विराटने रविवारी श्रीलंकेविरुद्ध 110 चेंडूंमध्ये नाबाद 166 धावा करत 74 वं शतक झळकावलं.

71 व्या शतकानंतर विराटने मागे वळून पाहिलं नाही असं म्हणता येईल अशी कामगिरी तो मागील काही महिन्यांपासून करतोय. त्याला सूर गवसल्याने एका चाहत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला असून विराटने जेव्हा 74 वं शतक ( झळकावलं त्याच दिवशी या चाहत्याने आपला पण पूर्ण करत लग्न केलं.

या चाहत्याचं नाव आहे अमन अग्रवाल. जोपर्यंत विराटचे (Virat Kohli) ७१ वे शतक होणार नाही तोपर्यंत लग्न करणार नसल्याचे सांगितले होते. अमनने आता विराटच्या 74 व्या शतकानंतर एक फोटो शेअर केला आहे. यापैकी एका फोटोमध्ये तो ज्या पोस्टरमुळे लोकप्रिय झाला ते पोस्टर पकडून मैदानात बसल्याचा फोटो आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये तो शेरवानी परिधान करुन टीव्ही स्क्रीनसमोर उभा असल्याचं दिसत आहे. टीव्हीवर विराट त्याचं 74 वं शतक साजरं करताना दिसत आहे.

सध्या त्याचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोसोबत त्याने मी ७१ व्या शतकाची मागणी केली होती. त्याने माझ्या आयुष्यातील महत्वाच्या दिवशी ७४ वे शतक साजरे केले, अशा शब्दात त्याने आपला आनंद व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT