virat kohli's highest runs to chris gayle's highest score know unbreakable records in ipl history  yandex
क्रीडा

IPL Records: गेलचं विक्रमी शतक ते विराटचा कहर; IPL स्पर्धेतील हे रेकॉर्ड्स मोडणं कठीण नव्हे तर अशक्यच

Ankush Dhavre

Unbreakable Records In IPL :

इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या हंगामाचं वेळापत्रक बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले आहे. आयपीएलचा पहिला टप्पा २२ मार्च ते ७ एप्रिल यादरम्यान खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत एका ट्रॉफीसाठी १० संघ भिडताना दिसून येणार आहेत. यादरम्यान नवनवीन रेकॉर्ड केले जाणार आणि मोडले देखील जाणार. मात्र या स्पर्धेतील असे काही रेकॉर्ड आहेत, जे मोडणं खूप कठीण आहेत. कोणते आहेत ते रेकॉर्ड्स? जाणून घ्या.

युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना पुणे वॉरियर्सविरुद्ध ६६ चेंडूंमध्ये १७५ धावांची नाबाद खेळी केली होती. तर आयपीएल स्पर्धेत दुसरी सर्वात मोठी खेळी करण्याचा रेकॉर्ड हा ब्रेंडन मॅक्क्युलमच्या नावावर आहे.

त्याने स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात १५८ धावांची दमदार खेळी केली होती. आयपीएल २०१६ मध्ये विराट कोहलीने ९७३ धावा केल्या होत्या. कोहलीशिवाय कोणत्याही फलंदाजाने आयपीएलच्या एकाच हंगामात ९०० धावांचा आकडा पार केलेला नाही. हा रेकॉर्ड मोडण्यासाठी कोहलीच्या सर्वात जवळ शुबमन गिल आहे. गेल्या हंगामात शुभमनने ८९० धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये सर्वात जास्त हॅट्रिक करणारा अमित मिश्रा हा एकमेव गोलंदाज आहे. त्याने २००८ मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध खेळताना पहिली हॅट्रिक केली होती. त्यानंतर २००८ मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध खेळताना दुसरी आणि २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध खेळताना तिसऱ्यांदा हॅट्रिक घेत हा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला. युवराज सिंगच्या नावावर २ हॅटट्रिक आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम आरसीबीच्या नावावर आहे. २०१३ मध्ये, गेलच्या शतकामुळे आरसीबीने पुणेविरुद्ध खेळताना २६३ धावा केल्या. (Cricket news in marathi)

आयपीएल २०१४ मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. त्या हंगामात केकेआरने सलग १० सामने जिंकत नवा विक्रम घडवला होता. यासह गोलंदाजी करताना सर्वोत्तम कामगिरी करण्याचा विक्रम अल्झारी जोसेफच्या नावावर आहे.

त्याने २०१९ मध्ये हैदराबादविरुद्ध खेळताना ६ विकेट्स घेतल्या होत्या. सर्वाधिक फायनल खेळण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. धोनीने १० वेळा अंतिम फेरी प्रवेश केला आहे. यादरम्यान ५ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT