Virat Kohli Shubman Gill Viral Video twitter
Sports

Virat Kohli Viral Video: स्टेडियममधून विराट..विराटच्या घोषणा; विराटनं केलेल्या कृतीचा Video पाहून तुम्हीही कराल कौतुक!

Virat Kohli Shubman Gill Viral Video: या सामन्यानंतर विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Viral Video:

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ३३ वा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी श्रीलंकेच्या फलंदाजांच्या नांग्या ठेचत ३०२ धावांनी विजय मिळवला.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३५७ धावांचा डोंगर उभारला होता.या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव अवघ्या ५५ धावांवर आटोपला.

या सामन्यातही विराटला शतक करण्याची संधी होती. मात्र त्याचं शतक अवघ्या १२ धावांनी हुकलं. दरम्यान या सामन्यानंतर त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

विराट कोहली फलंदाजी करत असताना आपल्या क्लासिक फलंदाजीन चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. तर क्षेत्ररक्षण करत असताना देखील तो चाहत्यांचं मनोरंजन करण्यात कुठलीच कसर सोडत नाही. त्याचे डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. मात्र यावेळी तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

हजारो प्रेक्षक विराटला सपोर्ट करण्यासाठी मैदानात हजेरी लावत असतात. स्टेडियममध्ये विराटच्या नावाचा एकच जयघोष सुरु असतो. मात्र यावेळी विराटने प्रेक्षकांना आपल्या नावाचा जयघोष करण्यापासून थांबवलं.

त्याने सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांकडे पाहिलं आणि इशारा केला की तुम्ही शुभमन गिलच्या नावाचाही जयघोष करा. शुभमन गिलने या सामन्यात ९२ धावांची तुफानी खेळी केली. विराटच्या या कृतीने नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये प्रवेश..

हा सामना जिंकून भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाने या स्पर्धेतील ७ पैकी ७ सामने जिंकले आहेत. १४ गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान आहे.

तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघ पुढील सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reem Shaikh: 'दुसऱ्या धर्माच्या मुलासोबत लग्न दूरच प्रेमही करू शकणार नाही', प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं कारण; म्हणाली...

Maharashtra News Live Update: भंडाऱ्याजवळ वाळू घाटावर भरधाव धावणारा ट्रॅक्टर उलटून चालकाचा दबून मृत्यू

Shocking : नामंकित हॉटेलवर पोलिसांची रेड, रूमचा दरवाजा उघडताच तरुण- तरुणी नको त्या अवस्थेत सापडले

Nauvari Saree Hairstyles: अंबाड्यापासून ते वेणीपर्यंत..., या 5 ट्रेडिंग हेअरस्टाईल्स नऊवारी साडीवर नक्की ट्राय करा

Wage Code: १५ मिनिटे जास्त काम अन् पगार होणार डबल! सरकारचा मोठा निर्णय काय? वाचा नवे नियम

SCROLL FOR NEXT