pakistani cricket fan viral video twitter
Sports

Virat Kohli Female Fan Viral Video: शेजाऱ्यांवर प्रेम करणं चुकीचं नाही... तरुणीचं विराट प्रेम पाहून पाकिस्तानी फॅन्सचा तिळपापड

Virat Kohli Female Pakistani Fan Viral Video: सध्या सोशल मीडियावर विराटच्या फॅनचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Female Fan Viral Video, Asia Cup :

भारत- पाकिस्तान याच्यांतील हाय व्होल्टेज सामना श्रीलंकेतील कँडीमध्ये रंगला. हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमने सामने येतात तेव्हा विराटची बॅट चांगलीच तळपते. मात्र या सामन्यात विराटला मोठी खेळी करता आली नाही.

शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर विराट कोहली अवघ्या ४ धावा करत माघारी परतला. त्यामुळे क्रिकेट चाहते निराश झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

या सामन्यानंतर विराटला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या एका महिला क्रिकेट फॅनचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Virat Kohli Fan Viral Video)

या व्हिडिओमध्ये तु्म्ही पाहू शकता की, विराट कोहलीची फॅन विराटचं कौतुक करताना दिसून येत आहे. तसेच विराट लवकर बाद झाल्याने ती नाराज झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये या महिला फॅनने म्हटले की. 'विराट कोहली हा माझा आवडता खेळाडू आहे.

त्याच्यासाठीच मी सामना पाहण्यासाठी आले होते. मला त्याला खेळताना पाहायचं होतं. मला असं वाटत होतं की, त्याने शतक पूर्ण करावं.'

कोणाला सपोर्ट करायला आली आहेस?

ज्यावेळी तिला विचारण्यात आलं की, तू कोणाला सपोर्ट करण्यासाठी इथे आली आहेस? त्यावेळी मी भारत आणि पाकिस्तान दोघांना सपोर्ट करतेय, असं तिने म्हटलं.

हे म्हणत असताना तिला एका व्यक्तीने थांबवण्याचा प्रयत्न केला आणि असं दाखवण्याचा प्रयत्न केला की, ती केवळ विराटला सपोर्ट करतेय भारताला नाही. मात्र त्या महिलेने तोडीस तोड उत्तर देत, शेजांऱ्यावर प्रेम करणं चुकीचं नाही ना.. असं म्हटलं. (Latest sports updates)

ज्यावेळी तिला विचारण्यात आलं की, बाबर आणि विराटपैकी तुझा आवडता खेळाडू कोण? हा प्रश्न ऐकताच तिने क्षणही न दवडता विराट असं उत्तर दिलं. या महिलेच्या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पाकिस्तान संघासमोर विजयासाठी २६७ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र दुसऱ्या डावात पावसाचे आगमन झाल्याने हा सामना पूर्ण होऊ शकलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT