Virat Kohli Smashes Explosive Century Vijay Hazare Trophy saam tv
Sports

घायल हूं इसलिए घातक हूं! 'धुरंधर' विराट कोहलीनं ठोकलं तुफानी शतक, विजय हजारे ट्रॉफीत दणका उडवला

Virat Kohli century : लिस्ट ए क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री करणाऱ्या विराट कोहलीची बॅट तळपलीये. पहिल्याच सामन्यात विराटनं तडाखेबंद शतक ठोकलंय. आता क्रिकेटचा देव असलेल्या सचिनच्या वर्ल्ड रेकॉर्डच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

Nandkumar Joshi

फॉर्म हरवलाय, फॉर्म हरवलाय...अशी बोंब ठोकून टीम इंडियाच्या वनडे संघातून वगळण्यात यावं, अशी चर्चा चघळणाऱ्यांना विराट कोहलीनं आपल्या बॅटमधून सणसणीत उत्तर दिलंय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध आक्रमक फलंदाजी करून हिटमॅन रोहितला खंबीर साथ देणाऱ्या विराटनं आता विजय हजारे ट्रॉफीत दिल्लीकडून खेळताना पहिल्याच सामन्यात तुफानी शतक ठोकलंय. त्याची तळपणारी बॅट आणि त्यातून निघणाऱ्या धावा बघून टीकाकारांचं तोंड बंद झालंय. कोहलीनं अवघ्या ८३ चेंडूंत आपलं शतक पूर्ण केलंय.

विराट कोहली सध्या डोमेस्टिक क्रिकेट खेळत आहे. सध्या तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीच्या संघातून खेळतोय. पहिल्याच सामन्यात त्यानं शतकी खेळी साकारलीय. लिस्ट ए मध्ये १६००० धावा पूर्ण करून सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री करणाऱ्या विराटनं एक पाऊल पुढे टाकलंय. क्रिकेटचा देव सचिनच्या वर्ल्ड रेकॉर्डच्या दिशेनं एक पाऊल पुढं टाकलं आहे. दिल्लीकडून खेळताना विराटनं अवघ्या ८३ चेंडूंत शतकी खेळी केली. या खेळीत त्यानं चौकार-षटकारांची आतषबाजी केली.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्ली संघाचं नेतृत्व रिषभ पंत करत असून, विराट कोहली या संघातून खेळतोय. दिल्लीचा पहिला सामना आंध्र प्रदेशविरुद्ध झाला. प्रथम फलंदाजी करताना आंध्र संघानं ८ बाद २९८ धावा कुटल्या. दिल्ली संघासमोर हे मोठं आव्हान होतं. ते पार करण्याच्या इराद्यानं दिल्लीचा संघ मैदानात उतरला. पण सलामीवीर अर्पित खातं न उघडताच बाद झाला आणि दिल्लीला पहिला झटका लागला. त्यानंतर कोहली मैदानात उतरला. सुरुवातीला 'थेंबे थेंबे तळे साचे...' प्रमाणं धावा जमवत गेला. कारण समोर प्रियांश आर्या हा आक्रमक फलंदाजी करत होता. त्यानं ४४ चेंडूंत ७४ धावा केल्या. त्यात सात चौकार आणि पाच षटकार होते. विराट कोहलीला जशी लय सापडली, तसं त्यानं झटपट आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

रन चेज मास्टर म्हणून ओळख असलेल्या विराट कोहलीनं बघता बघता आपलं शतकही पूर्ण केलं. त्यासाठी त्यानं ८४ चेंडूंचा सामना केला. या शतकी खेळीसह विराट कोहली सचिन तेंडुलकरच्या आणखी एका विश्वविक्रमाच्या जवळ पोहोचला आहे. लिस्ट ए मध्ये सर्वाधिक शतके सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. या क्रिकेट प्रकारात त्यानं ६० शतके ठोकली आहेत. तर कोहलीची आता लिस्ट ए मध्ये ५८ शतके झाली आहेत. सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडण्यासाठी विराटला आता अवघ्या तीन शतकांची आवश्यकता आहे. या यादीत इंग्लंडचा दिग्गज ग्राहम गूच तिसऱ्या स्थानी आहे. त्याच्या नावावर ४४ शतके आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

Actor Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंनी उभारलेल्या देवराईला अचानक आग

SCROLL FOR NEXT