Virat Kohli : विराट कोहलीचा नवा विक्रम; सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

vijay hazare trophy : रनमशीन विराट कोहलीनं नवा विक्रम केला आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ मध्ये दिल्लीकडून पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या विराटनं आंध्र प्रदेशविरुद्ध खातं उघडताच इतिहास रचला.
विजय हजारे ट्रॉफीत विराट कोहलीनं रचला इतिहास, सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री
Virat Kohli Vijay Hazare Trophysaam tv
Published On

Virat Kohli New Record : कसोटी, टी २० मध्ये थांबला असला तरी, वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खोऱ्यानं धावा ओढणारा रनमशीन विराट कोहली यानं नवा विक्रम केला आहे. बऱ्याच काळानंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये कमबॅक करत त्यानं विक्रमाला गवसणी घातली आहे. विराट कोहली दिल्ली संघाकडून आंध्र प्रदेशविरुद्ध विजय हजारे ट्रॉफीमधला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. मैदानात येताच चौकार ठोकून खातं उघडलं आणि इतिहास रचला.

बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सिलेन्स ग्राउंड १ वर दिल्ली विरुद्ध आंध्र प्रदेश यांच्यात सामना सुरू झाला. दिल्लीची अवघी एक धाव असताना पहिला झटका बसला. त्यानंतर विराट कोहली मैदानात आला. मैदानात येताच त्यानं गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. चौकार ठोकून त्यानं खातं उघडलं. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यानं १६००० धावा पूर्ण केल्या. लिस्ट ए क्रिकेटमध्ये हा पल्ला गाठण्यासाठी त्याला केवळ एका धावेची आवश्यकता होती.

सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

विराट कोहली लिस्ट एमध्ये १६ हजार धावा करणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर यानं हा ऐतिहासिक पल्ला गाठला होता. सचिनने लिस्ट ए क्रिकेटमध्ये २१९९९ धावा केल्या होत्या. आता सचिनच्या स्पेशल क्लबमध्ये विराट कोहलीची एन्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे विराट कोहली हा लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६ हजार धावा करणारा जगातील नववा फलंदाज ठरला आहे. इतकेच नाही तर, विराट कोहलीने ३३० डावांमध्ये सर्वात वेगवान १६ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. याबाबतीत त्यानं सचिनलाही मागे टाकलं आहे. सचिनने ३९१ डावांमध्ये १६ हजार धावा केल्या होत्या.

विजय हजारे ट्रॉफीत विराट कोहलीनं रचला इतिहास, सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री
फिरकी गोलंदाजी, शेवटच्या षटकांत तुफानी फटकेबाजी; ५ आयपीएल संघांकडून खेळलेल्या भारतीय क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती

आंध्रकडून दिल्लीला २९९ धावांचं लक्ष्य

विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ मध्ये दिल्ली आणि आंध्र यांच्यात सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून कर्णधार रिषभ पंत यानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आंध्र प्रदेशनं प्रथम फलंदाजी करताना ८ विकेटच्या मोबदल्यात २९८ धावांचा डोंगर उभारला. रिकी भुई यानं सर्वाधिक १२२ धावा केल्या. तर दिल्लीकडून सिमरजीत सिंह यानं पाच, तर प्रिन्स यादव यानं तीन विकेट घेतल्या. सध्या दिल्लीची फलंदाजी सुरू असून, विराट कोहलीनं अर्धशतकी खेळी केली आहे.

विजय हजारे ट्रॉफीत विराट कोहलीनं रचला इतिहास, सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री
WPL 2026: छोटा पॅकेट, बडा धमाका! वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या फलंदाजाला दिल्ली कॅपिटल्सनं केलं कॅप्टन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com