Rohit Sharma and Virat Kohli saam tv
Sports

धोनीसोबतही असेच होतं... रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहली कुणावर भडकला, मैदानावर नेमकं काय झालं?

Virat Kohli statement on crowd behavior in Vadodara ODI: वडोदऱ्यातील पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर प्रेक्षकांनी केलेल्या जल्लोषावर विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली. सामनावीर पुरस्कार घेताना त्याने चाहत्यांच्या वर्तनावर स्पष्ट मत मांडले आणि धोनीसोबत आयपीएलमध्येही असेच घडते, असे सांगितले

Namdeo Kumbhar

Why Virat Kohli was angry at fans after Rohit Sharma got out: वडोदरामध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा ४ विकेटने पराभव केला. ९३ धावांची झंझावाती खेळी करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. वडोदऱ्यात झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर विराट कोहलीने चाहत्यांची कानउघडणी केली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चाहत्यांनी केलेल्या जल्लोषावर विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली. आयपीएलमध्ये धोनीसोबतही असेच होत असल्याचे तो म्हणाला. मैदानात नेमकं काय झालं, विराट कोहली चाहत्यांवर का भडकला? पाहूयात..

वडोदऱ्यातील मैदानात भारतीय संघ ३०१ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. रोहित शर्माने शानदार सुरूवात केली. पण रोहित शर्मा बाद झाला. आता विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात उतरणार असल्याचे समजताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्जसाठी मैदानात उतरतो, तेव्हा झालेल्या जल्लोषाच्या स्वागताची आठवण करून देणारे हे दृश्य होते. संघाने विकेट गमावली असली तरी चाहत्यांकडून जल्लोष करण्यात येतो. सर रवींद्र जाडेजा यानेही या वर्तनावर अनेकदा नाराजी व्यक्त केली. सामन्यानंतर विराट कोहलीला याबद्दल विचारले असता त्याने स्पष्टपणे सांगितले की त्याला चाहत्यांचे हे वर्तन आवडत नाही.

विराट कोहली नेमकं काय म्हणाला ?

सामनावीर पुरस्कार घेताना विराट कोहली म्हणाला, "आपला एखादा खेळाडू बाद झाल्यानंतर असा जल्लोष करणं योग्य नाही. तुम्ही दुसऱ्या खेळाडूचे स्वागत करत असाल, पण बाद झालेल्या खेळाडूसाठी ही भावना चांगली नाही. चेन्नईकडून खेळताना धोनीसोबतही असेच घडताना अनेकदा पाहिले. मी प्रेक्षकांचा उत्साह समजतो, परंतु मी माझ्या जबाबदारीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो आणि जास्त विचार करत नाही."

७ धावांनी शतक हुकले -

वडोदऱ्याच्या मैदानावर विराट कोहलीची बॅट तळपली. भारताने सहा विकेटने न्यूझीलंडचा पराभव केला. पण फक्त ७ धावांनी विराट कोहलीचे ५४ वे एकदिवसीय शतक हुकले. मागील काही सामन्यात विराट कोहली तुफान फॉर्मात आहे. मागील सात डावात त्याने ४५० पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. त्यामध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेस आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने शानदार कामगिरी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Naigaon BDD Project : 'बीडीडी'वासींच्या गृहप्रवेशाला मुहूर्त मिळाला, म्हाडाच्या घराच्या चाव्या या दिवशी मिळणार, वाचा...

Kitchen Hacks : जेवणात टोमॅटो का वापरावा ? जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Pooja Khedkar: बेशुद्ध केलं, हात-पाय बांधले नंतर...; पूजा खेडकर यांच्या घरी जबरी चोरी

Mugdha-Prathamesh : मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या घरी आला नवा पाहुणा, VIDEO शेअर करून दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT