Virat Kohli Security 
Sports

Virat Kohli Security: विराट कोहलीच्या सुरक्षेला धोका; RCB चे सराव सत्र अचानक रद्द! नेमकं काय घडलं?

IPL 2024 Qualifier, RR vs RCB: आयपीएल २०२४ स्पर्धेतील एलिमिनेटरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील एलिमिनेटरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ चेन्नईला क्वालिफायर २ चा सामना खेळण्यासाठी रवाना होईल. तर पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडणार आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या सुरक्षेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. (Virat kohli security)

दैनिक आनंद बाजार पत्रिकाने गुजरात पोलीस अधिकाऱ्यांचा हवाला देऊन नमुद केले आहे की, विराट कोहलीच्या सुरक्षेला धोका असल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने प्रशिक्षण सत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही संघांनी पत्रकार परिषदही घेतली नव्हती. गुजरात पोलीसांनी सोमवारी (२० मे) रात्री अहमदाबादच्या विमानतळावर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय घेऊन ४ अज्ञातांना अटक केली आहे. पोलीसांनी या अज्ञातांचा ठावठिकाणा शोधून काढला असता, त्या ठिकाणी संशयास्पद व्हिडिओ आणि शस्त्र जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. (Virat kohli latest news in marathi)

आयपीएल २०२४ स्पर्धेतील क्वालिफायर १ आणि एलिमिनेटरचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर स्टेडियमवर होणार आहे. क्वालिफायर १ च्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणिक सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा सराव गुजरात कॉलेजच्या ग्राऊंडवर सुरु होता. अचानक प्रशिक्षण रद्द करण्याचा निर्णय का घेतला, याबाबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून कुठंलही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravana Nakshatra : मकर राशीच्या व्यक्तींचे आयुष्य आणि श्रवण नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचे करियर जाणून घ्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप, ठाकरेंचे खासदार आणि आमदार महायुतीच्या संपर्कात? भाजपच्या संकटमोचकाचा दावा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT